गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल पुण्यात गुन्हे अन्वेषण विभागाला भेट दिली. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चाही केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली. आगामी काळात पुण्यात दीड ते दोन लाख सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचं देशमुख यांनी यावेळी सांगितलं. भाजप सरकारच्या काळात राजकीय पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅप करण्यात आले होते. त्याची चौकशी करण्यासाठी दो वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. जळगावच्या भाजपच्या एका बड्या नेत्यानेही त्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणाचीही चौकशी करण्यास सांगितले आहे. त्याचाही विचार करण्यात येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
आंध्रातील कायद्याचा अभ्यास करणार
राज्यात हिंगणघाट सारख्या घटनांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात येणार आहे. बलात्कार रोखण्यासाठी आंध्रप्रदेश सरकारनं केलेल्या कायद्याचा आम्ही अभ्यास करणार आहोत. त्यासाठी येत्या २० फेब्रुवारी रोजी स्वत: आंध्रप्रदेशात जाणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times