‘संभाजीराजे छत्रपती हे महाराष्ट्रातील एक सन्माननीय नेते आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असल्याने सर्वांनाच त्यांच्याबद्दल आदर आहे. तसंच मराठा आरक्षणाबाबत त्यांनी जो संताप व्यक्त केला त्या भूमिकेशी सर्वच राजकीय पक्ष सहमत आहेत,’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
‘प्रमुख बैठक PM मोदींसोबत घ्यावी लागेल’
‘संभाजीराजे राज्यातील प्रमुख नेत्यांना भेटले. ते शरद पवार यांना भेटले, तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचीही त्यांनी भेट घेतली. पण आता पंतप्रधान मोदी यांच्यासोबत प्रमुख बैठक असायला हवी. कारण हा प्रश्न आता राज्याच्या हातात राहिलेला नाही. कोर्टाच्या निर्णयानंतर हा प्रश्न केंद्राकडे गेला आहे. त्यामुळे आपण सर्वजण पंतप्रधानांकडे जाऊ. त्यामुळे कोणताही पक्षीय विषय येत नाही. नरेंद्र मोदी यांच्या हातात हुकूमाची पाने आहेत, त्यांनी ती टाकावीत. महाराष्ट्र सरकार एकमुखाने संभाजीराजे छत्रपती यांच्या चळवळीच्या सोबत आहे,’ असंही संजय राऊत यांनी यावेळी जाहीर केलं.
लक्षद्वीपमधील घटनेवर काय म्हणाले राऊत?
‘अंदमान-निकोबार किंवा लक्षद्वीप यांसारख्या केंद्र शासित प्रदेशांमध्ये निर्णय घेताना काळजीपूर्वक घेतले पाहिजेत. कारण लक्षद्वीपमध्ये बीफ बंदीचा निर्णय घेण्यात आला. मात्र गोवा, केरळ आणि पूर्वेकडील अनेक भाजपशासित राज्यांमध्ये बीफ बंदी नाही. त्यामुळे प्रशासकीय नियुक्त्या असतील किंवा अन्य काही निर्णय हे विचारपूर्वक घेतले गेले पाहिजेत, नाहीतर या भागात मोठा असंतोष निर्माण होऊ शकतो,’ असा इशारा संजय राऊत यांनी केंद्र सरकारला दिला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times