गोंदियाः जालना (jalna) भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियलवाले यांना पोलिसांनी मारहाण केली होती. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजपनं निषेध व्यक्त केला आहे. त्यानंतर गोंदिया जिल्ह्यातील पोलिसांच्या मारहाणीत एका आरोपीचा मृत्यू झाल्याची माहिती भाजप नेत्या यांनी दिली आहे.

जालना भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियलवाले यांना झालेल्या मारहाणीबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis)यांनी निषेध व्यक्त केला होता. ही घटना ताजी असतानाच गोंदियातही पोलिसांच्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. चित्रा वाघ यांनी याकडे लक्ष वेधलं आहे. त्यांनी एक ट्वीटही केलं आहे.

जालना मारहाण प्रकरणानंतर गोंदिया पोलिसांचा एक प्रताप समोर, असं वाघ यांनी म्हटलं आहे. ‘आमगाव तालुक्यात आरोपी राजकुमार याचा पोलिसांनी लाकडी दांडा असलेल्या पट्ट्याने मारहाण करत जीव घेतला,’ असा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे. पोलिसनिरीक्षक व इतरांवर सीआयडीने गुन्हा दाखल केलाय, असंही वाघ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आमगाव येथील मारहाण प्रकरणातील आरोपी राजकुमार अभयकुमार याचा २२ मे रोजी मृत्यू झाला असून या प्रकरणी पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण आणि ४ पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध तपास झाल्यानंतर ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here