: कॅबिनेट बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील (Gadchiroli ) उठवण्याता निर्णय नुकताच घेण्यात आला. दारुबंदीचा निर्णय यशस्वीपणे राबवता न आल्याने ही बंदी उठवण्यात आल्याचं स्पष्टीकरण सरकारकडून देण्यात आलं. या पार्श्वभूमीवर आता शेजारील गडचिरोली जिल्ह्यातील दारुबंदी उठवण्याची चर्चाही जोर धरू लागली आहे.

चंद्रपूर जिल्ह्याप्रमाणे गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्यात यावी ही येथील जनतेची भावना असून आपण देखील याच मताचे आहोत, अशी प्रतिक्रिया राज्याचे आपत्ती आणि पुनर्वसन मंत्री (Vijay Wadettiwar) यांनी शनिवारी दिली. गडचिरोली दौऱ्यावर आले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

दारूबंदी करताना जे उद्देश ठेवण्यात आले होते, ते पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. तरीसुद्धा जिल्ह्यातील काही तथाकथित समाजसेवक स्वार्थापोटी दारू बंदीचे समर्थन करतात. मात्र, त्यांच्या मागे येथील नागरिकांचे समर्थन नाही, असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी समाजसेवक डॉ. अभय बंग यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. तसंच गडचिरोलीतील लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य जनता दारूबंदीच्या विरोधात असून पालकमंत्र्यांनी या संदर्भात बैठक घेऊन समीक्षा समिती स्थापन करण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी हटविल्याने आता गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांचे आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीने आता गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी हटविण्याकरता प्रयत्न करावेत, असा मतप्रवाहदेखील नागरिकांमधून समोर येत आहे.

दरम्यान, ‘ज्या क्षणी जिल्ह्यात दारुबंदी झाली तेव्हापासून अवैध दारुविक्रीचा धंदा सुरू झाला. यामध्ये मोठ्या प्रमाणात लहान मुलं आणि महिला यांचाही समावेश होता. ज्या चंद्रपूर जिल्ह्यात कधीही ड्रग्ज विक्री केली जात नव्हती तिथं दारुबंदीच्या निर्णयानंतर ड्रग्जही विकले जाऊ लागले. पोलिसांनी हे थांबवण्यासाठी प्रयत्न केले, मात्र यश आलं नाही.’ असा दावाही चंद्रपूरची दारुबंदी उठवताना विजय वडेट्टीवार यांनी केला होता. याच धर्तीवर आता गडचिरोली जिल्ह्यातील दारुबंदी उठवण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. याबाबत आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here