: राज्यातील करोना परिस्थिती हाताळण्यासाठी राज्य सरकार अपयशी ठरलं आहे, अशी टीका भाजप नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर () यांनी बुलडाण्यात केला आहे. जिल्ह्यातील धाड येथील आधार केअर सेंटरचे उद्घाटन प्रवीण दरेकर यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी दरेकर यांनी मराठा आरक्षणावरूनही () राज्य सरकारविरोधात जोरदार हल्लाबोल केला.

मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार पूर्णतः अपयशी ठरले असून जाणीवपूर्वक कसं जाईल याचीच काळजी राज्य सरकारकडून घेण्यात आली, असा घणाघाती आरोपही प्रवीण दरेकर यांनी केला.

‘…तर आम्ही पंतप्रधान मोदी यांच्याकडे जाऊ’
भारतीय जनता पार्टीची स्पष्ट भूमिका आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी संपूर्ण पाठबळ आम्ही देणार आहोत. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी भूमिका भाजपची आहे, असं प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केलं.

‘मराठा आरक्षणाच्या संदर्भात हुकमी एक्का नरेंद्र मोदी आहे हे राज्यातील सत्ताधाऱ्यांना सांगायची गरज नाही. आम्ही स्वतः त्यांच्याकडे जाऊन मराठा आरक्षणासंदर्भात मागणी करू. परंतु आपल्या संविधानामध्ये एक प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेनुसार आपल्याला काम करावं लागतं. लोकांना भरकटवण्यासाठी राज्य सरकारकडून वेगवेगळे फंडे उपयोगात आणले जात आहेत,’ अशी टीकाही दरेकर यांनी यावेळी केली.

संजय राऊत यांना फटकारलं!
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना प्रवीण दरेकर म्हणाले की, संजय राऊतांना सकाळी उठलं की दुसरे कोणतंच काम नाही. सकाळी उठल्यानंतर केंद्र सरकारच्या नावानं शिमगा करायचा, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नावाने शिमगा करायचा, भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्रजी यांना टार्गेट करायचे. आपलं अपयश आणि आपली अकार्यक्षमता कशी लपवायची हे त्यांच्याकडून शिकावं, असं ते म्हणाले

दरम्यान, ग्रामीण भागामध्ये करोनाची परिस्थिती बिकट आहे. अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य जनतेला आधार देण्याचे काम ग्रामीण स्तरावर उभा राहणारे कोविड केअर सेंटर करत आहेत, असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here