या कारणासाठी दिली म्हात्रे यांनी राजीनामा?
सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी बाळ्यामामा म्हात्रे यांनी मनसेकडून निवडणूक लढवली होती. त्यानंतर पुढे २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपा उमेदवार कपिल पाटील यांच्या विरोधात जाहीर भूमिका घेतली. त्यांची ही भूमिका शिवसेनेला मान्य नव्हती. त्यानंतर शिवसेनेने बाळ्यामामा म्हात्रे यांच्यावर कारवाई केली. त्याअंतर्गत तब्बल दोन वर्ष बाळ्यामामा निर्णयप्रक्रियेपासून दूर झाले. त्यादरम्यान त्यांच्यावर कोणतीही जबाबदारी सोपवण्यात आलेली नव्हती. आपण पक्षाकडून दुर्लक्षित झाल्याची भावना निर्माण झाल्याने बाळ्यामामा कमालीचे नाराज झाले होते. यामुळेच त्यांनी व्यक्तिगत कारण देत शिवसेनेच्या सदस्यत्वाचा आणि जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
क्लिक करा आणि वाचा-
बाळ्यामामा म्हात्रे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?
सुरेश ऊर्फ बाळ्यामामा म्हात्रे आता काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सध्या रंगली आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बाळ्यामामा यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. यामुळे या चर्चेला अधिक बळ मिळाले.
क्लिक करा आणि वाचा-
दरम्यान, बाळ्यामामा यांना येत्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढायची आहे आणि याच मुख्य कारणामुळे त्यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. म्हात्रे यांचे भिवंडी परिसरात मोठे नाव आणि वजन असल्याने त्या भागात शिवसेनेला मोठे खिंडार पडू शकते अशी चर्चा ऐकायला मिळत आहे.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times