: जगभरात करोनाच्या धडकेनंतर सर्वच गणिते बदलून गेली. अनेक मोठ्या स्पर्धा, कार्यक्रम रद्द करावे लागले. तसंच बहुतांश घटकांच्या दैनंदिन आयुष्यावरही मोठा परिणाम झाला. करोना विषाणूचा धुमाकूळ सुरू असल्याने शाळाही बंद ठेवण्यात आल्या. या काळामध्ये विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाणं अशक्य झालं. मात्र त्यामुळे त्यांच्या पोषण आहाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शासकीय अनुदानित शाळांमध्ये मध्यान्ह भोजन योजनेतून विद्यार्थ्यांना पोषण आहाराची रक्कम थेट त्यांच्या खात्यामध्ये टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल निशंक आणि केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी हा निर्णय घेत तब्बल १२ कोटी विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे.

केंद्र सरकारला सात वर्ष पूर्ण झाल्यानंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून १ हजार कोटी २० लाख रुपयांची रक्कम थेट १२ कोटी ८० लाख विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे.

हा ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक आणि राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी घेतला आहे. दुर्गम भागातील आदिवासी तसेच ग्रामीण विद्यार्थ्यांना उपयोगी सध्याच्या काळामध्ये उपलब्ध करून देण्यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here