शरद पवार ‘नरो वा कुंजरो वा’च्या भूमिकेत
प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी शरद पवार याच्यावर देखील भाष्य केले. शरद पवार यांचे राजकारण मी गेल्या ४० वर्षांपासून जवळून पाहत आहे. ते नेहमीच ‘नरो वा कुंजरो वा’च्या भूमिकेत असतात. शरद पवार लवकरच आरक्षणाबाबत भूमिका घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मराठा आरक्षणासाठी आता दोनच घटनात्मक मार्ग आहेत. एक म्हणजे कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणे आणि दुसरा मार्ग म्हणजे पहिली पुनर्विचार याचिका फेटाळल्यानंतर दुसरी याचिका दाखल करणे.. मात्र, असे असले तरी राजसत्तेशिवाय मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
‘संभाजीराजेंमुळे राजकारणात ताजेपणा येईल’
यावेळी त्यांनी सध्याच्या राजकारणावर देखील भाष्य केले. राजकारणात सध्या शिळेपणा आला आला असून राजकारणात ताजेपणा येण्याची आता गरज आहे. संभाजीराजे यांनी जर हा पुढाकार घेतला तर राजकारणात ताजेपणा येईल, असेही आंबेडकर म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times