आजपर्यंत राज्यात तपासण्यात आलेल्या एकूण ३ कोटी ४६ लाख ०८ हजार ९८५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५७ लाख १३ हजार २१५ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. हे प्रमाण १६.५१ इतके आहे. सध्या राज्यात २० लाख ५३ हजार ३२९ व्यक्ती गृह विलगीकरणात आहेत, तर १४ हजार ९८१ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या म्हणजेच ज्यांच्याव उपचार सुरू आहेत अशा रुग्णांची संख्या २ लाख ७६ हजार ५७३ इतकी आहे.
आज राज्यात एकूण ४४३ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या बरोबर सध्या राज्यातील मृत्यूदर १.६५ टक्के इतका आहे. याबरोबर राज्यात आज ३१ हजार ९६४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण ५३ लाख ३९ हजार ८३८ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.४६ टक्क्यांवर पोहोचले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
राज्यातील सक्रिय रुग्णांच्या संख्या २ लाख ७६ हजार ५७३
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २ लाख ७६ हजार ५७३ इतकी झाली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमधील सक्रिय रुग्णांच्या संख्येतही घट होताना दिसत आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुण्यात एकूण ४० हजार ७५४ इतके रुग्ण आहेत. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा २८ हजार ६०६ इतका आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या १९ हजार १३६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या १७ हजार ८५८ इतकी आहे. तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या १३ हजार ०१२ इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ९ हजार ९५३ इतकी आहे.
क्लिक करा आणि वाचा-
या बरोबरच अहमदनगरमध्ये १० हजार ९१९ इतकी आहे. औरंगाबादमध्ये ४ हजार ७३१, नांदेडमध्ये ही संख्या ३ हजार ४९० इतकी आहे. जळगावमध्ये ६ हजार ४६३, तसेच तर रायगडमध्ये एकूण ५ हजार ४६४ इतके सक्रिय रुग्ण आहेत. अमरावतीत ही संख्या ५ हजार ५२४, तर, राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुण्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या नंदूरबार जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या ९०९ इतकी आहे.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times