म. टा. प्रतिनिधी,

जळगाव महापालिकेत मार्च महिन्यात ऐतिहासिक सत्तांतर घडवल्यानंतर शिवसेनेने पुन्हा अवघ्या दोन महिन्यातच भाजपला धक्का दिला आहे. भाजपच्या पिंप्राळा मधील सुरेश सोनवणे, शोभा बारी, शबीना बी शेख शरीफ या तिन्ही नगरसेवकांनी शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मनगटावर शिवबंधन बांधल्याने खळबळ उडाली आहे. ५७ नगरसेवक निवडून आणून बहुमतात असलेली भाजपाचे संख्याबळ आता केवळ ३० इतकेच राहीले आहे. तर शिवसेनेने करेक्ट कार्यक्रम राबवित आपले संख्याबळ आता ४५ पर्यंत नेले आहे. विशेष म्हणजे भाजपाचे आणखीही काही नगरसेवक वार्डात विकासकामे व्हावीत यासाठी शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे विश्वसनिय वृत्त आहे. (three corporators joined in jalgaon)

भाजपाची सत्ता असलेल्या जळगाव महापालिकेत शिवसेनेने महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीपासून शिवसेनेने करेक्ट कार्यक्रम राबवित भाजपचे नगरसेवक आपल्याकडे खेचणे अद्याप सुरु ठेवले आहे. मार्च महिन्यात भाजपचे २७ नगरसेवक फोडल्यानंतर आता पुन्हा ३ नगरसेवक फोडून महापालिकेत शिवसेनेचे संख्याबळ ४५ पर्यंत पोहोचले आहे. तर भाजपचे संख्याबळ ५७ वरून आता ३० वर आले आहे. शनिवारी उपमहापौर कुलभूषण पाटील यांचा सोबत या तीनही नगरसेवकांनी मुंबईला मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी संपर्क प्रमुख संजय सावंत व विलास पारकर देखील उपस्थित होते.

महापालिकेतील सत्ता गमावल्यानंतर भाजपच्या शिल्लक असलेल्या ३० नगरसेवकांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात खदखद निर्माण झाली होती. त्यात प्रभागातील कामेदेखील थांबल्यामुळे नगरसेवकांमध्ये नाराजी वाढत असल्याने शिवसेनेने संधी साधत भाजपचे पुन्हा तीन नगरसेवक आपल्या गडाला लावले आहेत. दरम्यान, या तीनही नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातील विकास कामे पूर्ण करण्याचे आश्वासन शिवसेनेच्या नेतृत्वाकडून देण्यात आल्याची विश्वसनिय माहीती आहे.

क्लिक करा आणि वाचा-

आणखी ८ नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा
जळगाव महापालिकेचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी भाजपचे अजून आठ नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा केला आहे. सोमवारी किंवा मंगळवारी या नगरसेवकांचाही शिवसेनेत प्रवेश होणार असल्याचेही कुलभूषण पाटील यांनी सांगीतले.

क्लिक करा आणि वाचा-

विकासकामांसाठी पक्षांतर

आमच्या प्रभागातील अनेक कामे अनेक वर्षांपासून रखडलेलि आहेत. त्यात भाजपाने महापालिकेतील सत्ता गमावल्यामुळे इतर उर्वरित कामे देखील भविष्यात होतील की नाही, याबाबत शंका होती. शिवसेनेच्या नेतृत्वावर आम्हाला विश्वास असून, आमच्या प्रभागातील विकासकामे होतील याच अपेक्षेने आम्ही शिवसेनेत प्रवेश केला असल्याची माहीती नगरसेवक सुरेश सोनवणे यांनी ‘मटा’ शी बोलतांना दिली.

क्लिक करा आणि वाचा-

ज्यांना जायचे असेल त्यांनी जावे- आमदार महाजन

नगरसेवक शिवसेनेत प्रवेश केल्याबद्दल आपणास माहीती नाही. ज्याला जायचे आहे, त्यांनी जावे. संधीसाधु लोक असे करतात. सत्ता आली की तिकडे जातात, अश्या शब्दात भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांनी या नगरसेवकांच्या पक्षांतरावर आपली प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here