म. टा. प्रतिनिधी,
करोना काळात गावात पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याने संतप्त झालेल्या महिलांनी पालकमंत्री यांचा ताफा अडवला. ही घटना आज दुपारी चार वाजता जळगाव जिल्ह्यातील तालुक्यात असलेल्या उचंदा येथे घडली. (guardian minister convoy blocked by women for water in )

जळगाव जिल्ह्यातील रावेर व मुक्ताईनगर तालुक्यात दोन दिवसांपूर्वी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली होती. यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील हे आज दोन्ही तालुक्यांचा दौरा करत आहेत. या दौऱ्यादरम्यान उचंदा गावातील महिलांनी पाणीटंचाईच्या मुद्द्यावरून त्यांचा ताफा अडवला. या प्रकारामुळे एकच गोंधळ उडाला होता.

पंधरा दिवसांपासून पाण्यासाठी वणवण

संतप्त महिलांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा ताफा अडवून पाणीटंचाईची समस्या मांडली. ऐन करोना काळात गावात पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. महिलांना पाण्याअभावी मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. आम्हाला पाणी उपलब्ध करून घ्या, तुम्ही पाण्याचे मंत्री आहेत. आमच्या गावात पंधरा दिवसांपासून पाणी नाही. गावातील सरपंच, ग्रामसेवक आमची समस्या ऐकून घेत नाहीत, अशा शब्दांत महिलांनी आपली व्यथा मांडली.

क्लिक करा आणि वाचा-

तात्काळ कार्यवाहीच्या सूचना

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महिलांच्या अडचणी जाणून घेत त्यांना समस्येचे निराकारण करण्याचे आश्वासन दिले. ग्रामसेवक आणि बीडीओ यांना तातडीने पाणीटंचाई सोडविण्याचे निर्देश दिले. याबाबतचा सविस्तर अहवाल तयार करून तो आमदारांना सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

क्लिक करा आणि वाचा-

नुकसानग्रस्त भागाची पाहणी

मान्सूनपूर्व वादळी पावसामुळे रावेर व मुक्ताईनगर तालुक्यातील सुमारे 3 हजार हेक्टरवरील केळीच्या बागा तसेच घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तोक्ते वादळानंतर ज्याप्रमाणे कोकणला राज्य सरकारने जाहीर मदत केली, त्याच धर्तीवर या दोन्ही तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांना तातडीने मदत मिळवून दिली जाईल, असे आश्वासन आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here