सोलापूर: पोहता येत नसतानाही नदीच्या वाहत्या पात्रात उतरल्याने एकाच कुटुंबांतील चौघा बालकांचा भिमानदीत बुडून मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना आज दुपारी साडेतीन वाजता दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या लवंगी गावात घडली आहे.

याबाबतची सविस्तर घटना अशी की, आज दुपारी ३:३० वाजता शिवाजी रामलिंग तानवडे (वय ४० वर्षे) रा. लवंगी ता.द. सोलापूर हे भीमा नदीमध्ये पोहण्यासाठी गेले होते.तेथे थोड्या वेळाने त्यांच्या पाठीमागे तिच्या दोन मुली समीक्षा व आर्पिता आणि सोबत मेव्हण्याचा मुलगा विठ्ठल व मुलगी आरती असे चौघे नदीकडे आले. तेव्हा त्यांना घराकडे हाकलून देऊन शिवाजी हे पोहत नदीमध्ये आत गेले. पण थोड्या वेळाने ते चौघे परत नदीमध्ये पोहण्यासाठी उतरले.

मुलगी समीक्षा हीस पोहता येत होते, परंतु अर्पिताला थोडे थोडे पोहता येत होते. त्यावेळी ते चौघे नदीपात्रात अंघोळीसाठी उतरले. समीक्षाला पाण्यात पोहत असताना आरतीने पकडले व अर्पितास विठ्ठल याने पकडल्याने ते चौघे बुडत असताना त्यांचा आवाज ऐकून शिवाजी लगेच त्यांच्याजवळ पोहत गेला. त्यानंतर त्याने समीक्षा व आरती यांना थोडेसे बाजूला किनाऱ्याजवळ सोडून त्यांना किनाऱ्यावर जाण्यास सांगितले. मग अर्पिता व विठ्ठल यास सोबत कडेला आणत असताना पाहिले असता समीक्षा व आरती या पाण्याच्या प्रवाहामुळे बुडाल्या व शिवाजीच्या ताब्यातील विठ्ठल व अर्पिता पण निसटले व ते पण बुडून गेले.

हे पाहून शिवाजीचा ही धीर सुटल्याने तो पण बुजू लागला. हे पाहून त्याचे नातेवाईक राचाप्पा उर्फ अप्पू संगप्पा पारशेट्टी याने शिवाजी रामलिंग तानवडे यास बाहेर काढले.

क्लिक करा आणि वाचा-

भीमा नदीच्या पाण्यात बुडालेल्या मुलांची नावे खालील प्रमाणे

१) समीक्षा शिवाजी तानवडे वय १३ वर्ष इयत्ता आठवी.
२) अर्पिता शिवाजी तानवडे वय ११ वर्ष इयत्ता ७ वी
३) आरती शिवानंद पारशेट्टी वय १२ वर्ष. इ.७ वी
४) विठ्ठल शिवानंद पारशेट्टी वय १० वर्ष इ.५ वी

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here