नागपूर: विभागासाठी घातक ठरलेली कोविडची दुसरी लाट उतरणीला लागली आहे. भोवती करकचून आवळत चाललेला विषाणूचा विळखा सैल होताना दिसत आहे. जिल्ह्यात फेब्रुवारीपासून कोविडची दुसरी लाट सुरू झाली आणि प्रादुर्भाव गुणाकार पद्धतीने वाढला. त्यामुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी दर १७.०६ पर्यंत पोहचला होता. तो आता चार महिन्यांनी २.९ टक्क्यांवर घसरल्याने नागपूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. ( )

वाचा:

आज नागपुरात दिवसभरात तपासलेल्या १३ हजार ४४१ नमुन्यांपैकी ३९३ जणांच्या घशातील स्त्राव नमुन्यांमध्ये विषाणूचा अंश सापडल्याचे निदान करण्यात आले. समाधानाची बाब म्हणजे करोनाचा नवा हॉटस्पॉट झालेल्या ग्रामीण मधील विषाणूचा विळखाही आता सैल होत आहे. त्यामुळे कोविडच्या भीतीने लागलेल्या मधील निर्बंधही शिथील होतील आणि जनजीवन पूर्वपदावर येईल, अशी आशा बळावली आहे.

वाचा:

या घडामोडीत सध्या ७ हजार ८७८अॅक्टिव्ह बाधितांवर कोविड केअर सेंटर मध्ये उपचार केले जात आहेत. आज नव्याने करोनाचे निदान झालेल्यांपैकी २२४ शहरातील तर १६४ रुग्ण जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रहिवासी आहेत. मात्र शनिवारी दिवसभरात १४ कोविड बाधितांची विषाणूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली. करोनाने जिल्ह्यात शिरकाव केल्यापासून आतापर्यंत ४ लाख ७३ हजार ९२९ जणांना संसर्गाने गाठल्याचे निदान करण्यात आले. त्यातील ४ लाख ५७ हजार ३७२ बाधित उपचारांनी ठणठणीत बरे झाले आहेत. कोविडमुक्तीचा जिल्ह्यातील दर आता ९६ टक्क्यांपर्यंत गेला आहे.

ग्रामीणमधील अॅक्टिव्ह रुग्णसंख्याही घटली

सध्याच्या स्थितीत जिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटरमध्ये ७ हजार ४४८अॅक्टिव्ह बाधितांवर उपचार केले जात आहेत. त्यातील ४ हजार ४२५ कोविड अॅक्टिव्ह रुग्ण हे शहरातील तर ३ हजार ५० रुग्ण जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रहिवासी आहेत. काही दिवसांपूर्वी अॅक्टिव्ह रुग्णांचे शहर आणि ग्रामीण भागातील हेच प्रमाण जवळजवळ समसमान झाले होते. त्यामुळे जिल्ह्याचा ग्रामीण भाग कोविड संक्रमणाचा हॉटस्पॉट झाला होता.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here