जिल्ह्यात शनिवारी म्युकर मायकोसिसचे निदान झालेल्या नव्या ४३रुग्णांची भर पडली. त्यातील ४ जणांचा उपचारादम्यान मृत्यू ओढवला. त्यामुळे महिनाभरात नागपूर जिल्ह्यातील रुग्ण संख्या आता १ हजार ४५ च्या घरात गेली आहे. यातील ८१ मृत्यू हे एकट्या नागपूर जिल्ह्यातील आहेत.
जिल्ह्यात शनिवारी मेयो, मेडिकलसह शासकीय रुग्णालयात १८ तर खासगी रुग्णालयात २५ नव्या रुग्णांची वाढ झाली. त्यातील सरकारी रुग्णालयात १ आणि खासगी रुग्णालयात ३ असे एकूण ४ मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणेसमोर या आजाराचे मृत्यू रोखण्याचे आव्हान उभे ठाकत आहे.
कर मायकोसिसचा संसर्ग वाढल्याने सद्या शासकीय रुग्णालयात २५६ तर खासगी रुग्णालयात ७८२ बाधितांवर उपचार केले जात असल्याची नोंद जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने घेतली आहे.
क्लिक करा आणि वाचा-
पूर्व विदर्भात ८६ मृत्यू
म्युकरचा विळखा पडल्याने दगावलेल्या ८६ जणांपैकी ८१ मृत्यू हे एकट्या नागपुरातील आहेत. पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि वर्धा अशा सहा जिल्हयांमध्ये आतापर्यंत सुमारे १ हजार २३५ जणांना म्युकर मायकोसिसचे निदान झाले आहे. मृत्यत नागपुरातील ८१ सह विभागातील चंद्रपूरात १, गोंदियामध्ये ३, तर वर्धा येथे १ असे पाच मृत्यू झाले. नागपूरातील स्थिती सद्या भयावह आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times