राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या काकाकडे गेलेल्या एका साडे सोळा वर्षीय मुलीसोबत एका ६५ वर्षीय वृद्धाने घरात जावून तिचा केल्याची घटना घडली. या प्रकरणी मुलीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी वृध्दाविरुध्द बुधवारी (दि. २६) विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, वृध्द फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
राजहीलनगरमध्ये राहणारा हा ६५ वर्षीय वृध्द मंगळवारी (दि. २५) पिडीत मुलीच्या काकाकडे गेला. मुलीचे काका ऑटो चालवण्याचा व्यवसाय करतात. काका घरी आहे का, असे वृद्धाने तीला विचारले, त्यावेळी मुलीने काका घरी नसल्याचे सांगितले. त्यानंतर वृध्दाने मुलीशी लगट केली. या प्रकारामुळे मुलगी घाबरली व ती ओरडली. त्यावेळी घरात पिडीत मुलीच्या दोन लहान बहिणी होत्या, त्या बाहेर आल्यानंतर हा चाळे करणारा वृध्द घरातून निघून गेला.
क्लिक करा आणि वाचा-
या प्रकरणाची पीडित मुलीने तिच्या काकांना माहिती दिली. त्यामुळे त्यानी तातडीने घरी धाव घेतली. दरम्यान, या प्रकरणी मुलीने बुधवारी राजापेठ पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी अश्लिल चाळे करणाऱ्या या ६५ वर्षीय वृध्दाविरुध्द विनयभंग, पोस्को कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times