मुंबई: ‘, फेसबुकसारख्या सोशल मीडियाचा वापर करून व भाजपनं २०१४ आणि २०१९ च्या निवडणुका जिंकल्या. विरोधकांवर यथेच्छ चिखलफेक केली. या सोशल मीडियामध्ये आता नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारची ‘करोना’ हाताळणीसंदर्भात बदनामी होत आहे. हा काळानं त्यांच्यावर घेतलेला विलक्षण सूड आहे,’ असा सणसणीत टोला शिवसेनेचे खासदार यांनी हाणला आहे. ( Targets BJP and Over )

वाचा:

पंतप्रधान मोदी यांची बदनामी करण्यासाठी काँग्रेसनं एक ‘’ निर्माण केलं. पंतप्रधान मोदी, करोना लढ्यातील सरकारचं अपयश याबाबत कोणी काय लिहायचं, कधी कोणत्या वेळेस काय बोलायचं, कोणत्या माध्यमांवर काय बोलायचं, याबाबतची ‘कामं’ वाटून देणारी एक यादी काँग्रेसनं केली होती, असा आरोप भाजपनं केला आहे. मात्र, भाजपचा हा आरोप म्हणजे मूर्खपणाचं लक्षण आहे, अशी टीका राऊत यांनी ‘सामना’त लिहिलेल्या लेखातून केली आहे. ‘गंगेत प्रेते तरंगत आहेत. त्या प्रेतांचे फोटो व देशभरात पेटलेल्या चितांचे भडाग्नी जागतिक मीडियानं दाखवले. गंगेच्या किनाऱ्यावरील प्रेतांचे फोटो ‘ड्रोन’च्या माध्यमातून, आकाशातून काढले. ते ट्विटरसह सगळ्याच माध्यमांनी छापले. त्यामुळं भाजपचे लोक समाजमाध्यमांवर येऊन जी सारवासारव करत आहेत व काँग्रेसवर आरोप करत आहेत त्यावर कुणीच विश्वास ठेवणार नाही. कारण त्यांना गंगेतला प्रेतांचा प्रवाह, लसीकरणातला गोंधळ स्पष्ट दिसतो. ‘खोटं’ स्वीकारण्याची मर्यादा संपली आहे,’ असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

वाचा:

‘सर्व खरे-खोटे पसरविण्यासाठी याच ‘ट्विटर’चा वारेमाप वापर आतापर्यंत भाजपनं केला. २०१४ चे राजकीय युद्ध भाजपने ‘ट्विटर’सह सोशल मीडियाच्या फौजांच्या बळावर जिंकलं. त्यासाठी ‘आयटी’ सेल उभे करून हजारो कोटी रुपये ओतले. इतर राजकीय पक्षांनाही त्यामुळं स्वतःचे आयटी सेल उभे करावे लागले. सोशल मीडियावरील खोटारडेपणा पाहून आज गोबेल्सनेही आत्महत्या केली असती. जे लोक मोदी यांच्या बदनामीचा मुद्दा उचलत आहेत त्यांनी एका प्रश्नाचं उत्तर द्यावं. सहा महिन्यांपासून जे किसान आंदोलन सुरू आहे ते आंदोलन परदेशी पैशांवर सुरू आहे, त्या आंदोलनात खलिस्तानी अतिरेकी घुसले आहेत, या बदनामीच्या ‘टुलकिट’चे सूत्रधार कोण होते?,’ असा सवाल राऊत यांनी केला आहे.

‘सोशल मीडियावर व्यक्ती आणि विचारस्वातंत्र्याच्या स्वैराचारानं आज धुमाकूळ घातला आहे. त्यावर नियंत्रण हवेच, पण या माध्यमांवर संपूर्ण बंदी आणणं योग्य नाही. भाजपनं ट्विटर, टुलकिट वगैरेंबाबत उपस्थित केलेले मुद्दे चुकीचे आहेत असं नाही. प्रत्येकाची प्रतिष्ठा हा त्याच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग असतोच. पण भाजपच्या पुढाऱ्यांनी हा युक्तिवाद करणं हे त्यांच्या पूर्वीच्या कृतीशी सुसंगत नाही,’ असा चिमटा राऊत यांनी काढला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here