शनिवारी सायंकाळी नगर जिल्ह्याच्या बहुतांश भागात वादळी वाऱ्यासर पाऊस झाला. नगर शहराच्या पाणी योजनेचे पंपिंग स्टेशन असलेल्या विळद भागात वादळामुळे वीज पुरवठा खंडीत झाला. त्यापाठापोठा पाण्याचा आणि हवेचा दाब कमी जास्त होऊल रात्री साडेबाराच्या सुमारास मुख्य जलवाहिनी फुटली. मुळा धरणाहून या ८०० एम.एम. जलवाहिनीतून नगर शहराला पाणीपुरवठा केला जातो. दाब अनियंत्रित होऊन ती विळद जवळ फुटली. हा प्रकार लक्षात येताच. उपसा बंद करून दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. रात्रभर तंत्रज्ञ जलवाहिनी दुरुस्तीच्या कामात होते.
वाचा:
पाणी उपसा बंद करावा लागल्याने शहरातील पाण्याच्या टाक्या भरता आलेल्या नाहीत. दुरुस्तीचे काम झाल्यावर त्या भरण्यास सुरुवात झाली असली तरी वेळापत्रक कोलमडणार आहे. त्यामुळे रविवारी पाणी पुरवठा केल्या जाणाऱ्या शहराच्या मध्यवर्ती भागात आज पाणी मिळणार नाही. सिद्धार्थ नगर, लालटाकी, दिल्लीगेट, चितळे रोड, तोफखाना, सर्जेपुरा, नालेगांव, कापड बाजार, आनंदी बाजार, नवीपेठ, माणिक चौक, सावेडी गावठाण व बालिकाश्रम रोड या भागाचा पाणी पुरवठा रविवारी बंद राहणार आहे. तेथे सोमवारी त्यांच्या नेहमीच्या वेळेला पाणी पुरवठा करण्यात येईल. याशिवाय शहराच्या उपनगरांना रविवारी उशिरा आणि कमी दाबाने पाणी मिळेल.
सोमवारी रोटेशननुसार ज्या भागाला पाणी मिळते, त्या झेंडी गेट, सर्जेपुरा, मंगलगेट, कचेरी परिसर, हातमपुरा, रामचंद्र खुंट, कोठला, माळीवाडा, कोठी या भागाचा पाणी पुरवठा बंद राहील. तेतए मंगळवारी १ जूनला पाणी पुरवठा केला जाणार आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times