कोल्हापूर: ‘ हे रोज काहीतरी बोलतात. नेहरू आणि गांधी यांच्याबाबत राऊत यांचे मत यांनी ऐकले तर ते स्वर्गातून त्यांच्या थोबाडीत मारतील,’ अशी बोचरी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी आज केली. उपमुख्यमंत्री यांनाही त्यांनी यावेळी तोंड सांभाळून बोलण्याचा इशारा दिला. ( Slams )

कोल्हापुरात ते पत्रकारांशी बोलत होते. हा देश गांधी-नेहरू यांच्या विचारावर चालला आहे असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. त्यावरूनही पाटील यांनी त्यांना टोला हाणला. ‘राऊत यांचं हे मत ऐकलं तर बाळासाहेब ठाकरे स्वर्गातून त्यांना थोबाडीत मारतील,’ असं ते म्हणाले.

वाचा:

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार राज्य झोपेत असताना पडेल असं चंद्रकांत पाटील हे दोन दिवसांपूर्वी म्हणाले होते. यावर बोलताना बहुतेक पाटील झोपेतच हे बोलले असतील, असा चिमटा अजित पवार यांनी काढला होता. पाटील यांनी पवारांच्या या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, ‘शरद पवार झोपेतून उठायच्या आधी शपथ घेऊन तुम्ही मोकळे झाला होता. तुम्ही आमच्या बरोबर सरकारमध्ये सहभागी झाला. शपथही घेतली, पण २८ आमदार सुद्धा तुम्हाला सोबत ठेवता आले नाहीत. त्यामुळे यापुढे आमच्याबद्दल बोलताना तोंड सांभाळून बोला. आम्ही फाटके आहोत, आम्ही बोलायला लागलो तर फार अवघड जाईल.’

संभाजीराजेंची ‘ती’ भूमिका आम्हाला मान्य नसेल!

मराठा आरक्षणाबाबत जे जे संघर्ष करतील, त्यांच्यासोबत भाजप असेल, अशी ग्वाही पाटील यांनी दिली. ‘शरद पवार असो, अजित पवार असो वा संभाजी राजे, मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी कोणीही संघर्ष करणार असेल तर त्यांचा शिलेदार म्हणून मी त्यांच्यासोबत असेन. पण, करोनाचे नाव पुढे करून संघर्ष टाळला जात असेल तर हा प्रश्न सुटणार नाही. आणखी किती दिवस शांत बसायचे,’ असा प्रश्नही त्यांनी केला. ‘छत्रपती संभाजीराजे यांची भूमिका सरकारच्या बाजूची असेल तर ती आम्हाला मान्य नाही,’ असंही त्यांनी स्पष्ट केलं.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here