पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाला सात वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तानं सध्या केंद्र सरकारच्या कारभाराचा लेखाजोखा मांडला जात आहे. वृत्तवाहिन्यांवर व सोशल मीडियावर सरकारबद्दल मतं व्यक्त केली जात आहे. ही संधी साधून संजय राऊत यांनी मोदी सरकारच्या कारभारावर खोचक भाष्य केलं आहे. मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते.
वाचा:
‘नरेंद्र मोदी यांच्या सरकारला सात वर्षे पूर्ण झालीत. आधीची पाच वर्षे आणि आताची दोन वर्षे. मात्र, अजून बरंच काही करणं बाकी आहे. वर्षे येतात-जातात. स्वातंत्र्यापासून अनेक वर्षे गेली. पण पंडित नेहरू, , नरसिंहरावांपासून ते मनमोहन सिंहांच्या कार्यकाळावर नजर टाकली तर त्या काळात देश उभा राहिलेला दिसतो. या काळात देशात अनेक योजना, अनेक प्रकल्प कार्यान्वित झाले. त्याच मागच्या पुण्याईवर आजही देश चाललेला आहे. हे कुणीही नाकारणार नाही,’ असं राऊत म्हणाले.
‘मोदी आणि त्यांच्या सरकारकडं पूर्ण बहुमत आहे. लोकांनी त्यांच्यावर विश्वास व्यक्त करून त्यांना सत्तेवर बसवलं आहे. पंतप्रधान मोदी यांच्याकडं उत्तम नेतृत्वक्षमता आहे. ते देशाला योग्य देतील, अशी आशा आपण करू शकतो आणि करायलाच हवी,’ असंही ते म्हणाले.
वाचा:
‘देशात आजही महागाई, बेरोजगारी आहे. सरकारवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचं उत्तर मिळालेलं नाही. करोनाच्या काळात अराजक माजलंय. लोकांच्या अपेक्षा खूप कमी असतात. सर्वांनाच अदानी, अंबानी आणि टाटा-बिर्ला बनायचं नाही. फक्त रोजगार आणि रोजीरोटी हवी असते. उत्तम आरोग्य व शिक्षणाच्या सुविधा हव्या असतात. हे सगळं मागच्या देशात सरकारला मिळालंय का, यावर सरकारला आत्मचिंतन करायला हवं,’ असं राऊत म्हणाले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times