मुंबईतील काही हॉटेल त्यांच्या पॅकेजमधून कोविड लस देत आहेत. हे निदर्शनास आल्यानंतर केंद्र सरकारनं अशा हॉटेलांवर कारवाई करण्याचे आदेश राज्यांना दिले आहेत. ‘द ललित’ या हॉटेलात देखील ३,५०० रुपयांच्या पॅकेजमध्ये लस दिली जात असल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर महापौर पेडणेकर यांनी चौकशी करण्यासाठी थेट ‘द ललित’ हॉटेलला भेट दिली. या हॉटेलमध्ये दिवसाला ५०० लोकांना लस देण्यात आल्याची बाब समोर आली. किशोरी पेडणेकर यांनी स्वत: माध्यमांना याबाबत माहिती दिली.
वाचा:
या पाहणीत इतर अनेक गोष्टी समोर आल्या. ‘ललित हॉटेलमध्ये कोल्ड चेन मेन्टेन केली जात नव्हती. घरगुती वापराच्या फ्रीजमध्ये कोविड लसींचा साठा करण्यात आला होता. आइस बॅग म्हणून पाण्याच्या बाटल्यांचा वापर केला जात होता. त्यामुळं ‘द ललित’मध्ये झालेल्या लसीकरणाच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. महापौर पेडणेकर यांनी या प्रकाराबाबत हॉटेलच्या व्यवस्थापकांना जाब विचारला.
‘द ललित’मध्ये क्रिटीकेअर रुग्णालयाच्या माध्यमातून लस दिली जात आहे. क्रिटीकेअर रुग्णालयाला केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे. यात ललित हॉटेलचा फारसा संबंध नाही. मात्र, येथील लस साठवणीच्या पद्धतीबाबत साशंकता आहे. त्यामुळं या संपूर्ण प्रकाराची चौकशी केली जाणार असून क्रिटीकेअर रुग्णालयाचीही चौकशी केली जाईल, असं महापौरांनी सांगितलं.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times