मुंबई: ‘मोदी सरकारच्या नाकर्तेपणामुळे आज जनतेला लसीसाठी तडफडावे लागत आहे. याआधी देवी, गोवर, पोलिओसारख्या १३ लसी आल्या, त्या काँग्रेसने मोफत दिल्या, पण असा सावळा गोंधळ उडू दिला नाही. ७० वर्षांत काय केले असा विचारणाऱ्यांचे पाप गंगा नदीवर वाहताना जनेतेने पाहिले,’ अशी घणाघाती टीका मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष यांनी आज केली. (Congress Protest against )

वाचा:

मोदी सरकारच्या सात वर्षांच्या काराभाराचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने आज जिल्हा व तालुका पातळीवर काळ्या फिती लावून निदर्शने केली. भाई जगताप यांच्यासह मुंबईतील प्रमुख नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष यांच्या उपस्थितीत मुंबईतील विरोध प्रदर्शनात सहभाग घेतला. त्यावेळी जगताप बोलत होते. मोदी सरकारच्या सात वर्षांच्या कारभारावर जगताप यांनी यावेळी जोरदार टीका केली. ‘मोदी सरकार विरोधकांचा आवाज दपडपण्याचे काम करत आहे. परंतु घटनेने आम्हाला प्रश्न विचारणाचा अधिकार दिला आहे. आम्ही प्रश्न विचारत राहू, लोकांच्या प्रश्नासाठी पुन्हा रस्त्यावर उतरू,’ असंही जगताप म्हणाले.

पटोले यांनीही ओढले टीकेचे आसूड

नरेंद्र मोदींनी २०१४ च्या निवडणुकीत जनतेला खोटी स्वप्ने दाखवून सत्ता मिळवली, पण सात वर्षांत मोदी सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. करोनाची परिस्थिती हाताळण्यातही मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. पहिल्या लाटेत ‘नमस्ते ट्रम्प’च्या आयोजनात व्यस्त राहिले आणि परिस्थिती अंगलट येताच तबलिगीच्या नावावर करोनाचे खापर फोडून धार्मिक रंग देण्याचा उद्योग केला तर दुसऱ्या लाटेतही करोनाचे रुग्ण व मृत्यू वाढत असताना मोदी सरकार विधानसभेच्या प्रचारात दंग होते. मोदींनी आपल्या मनमानी कारभाराने १३० कोटी जनतेला करोनाच्या खाईत लोटले, त्यांना सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नसून मोदींनी राजीनामा द्यावा, अशी मागणी नाना पटोले यांनी केली.

वाचा:

‘महागाई प्रचंड वाढल्याने लोकांना जगणे कठीण झाले आहे. पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, खाद्यतेल सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. करोना महामारीत तर मोदी सरकारने अत्यंत बेजबाबदारपणा केला. लाखो लोक ऑक्सिजन, औषधांअभावी मरण पावले. जानेवारी २०२१ मध्येच लसीचे नियोजन केले असते तर आज लसीसाठी लोकांना रांगा लावाव्या लागल्या नसत्या पण १३० कोटी जनतेचा विचार करून त्या प्रमाणात लसींची मागणीच केली नाही. नंतर पाकिस्तानसारख्या देशाला मोफत लस वाटली आणि देशातील जनतेला वाऱ्यावर सोडले,’ असा आरोप पटोले यांनी केला.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here