सोलापूर : राज्यात करोनाचा धोका टाळण्यासाठी कडक लॉकडाऊन केलं असलं तरी जुगारी अड्डे काही थांबण्याचं नाव घेत नाही. आताही सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ऑर्केस्ट्रा बारमध्ये चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून एकूण २३ आरोपींसह २३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

विजापूर रोडवरील नागेश ऑर्केस्ट्रा बार इथं जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती एपीआय शितलकुमार कोल्हाळ यांना मिळाली होती. त्या महितीच्या आधारे, शहर गुन्हे शाखेच्या पथकाने सदर ऑर्केस्ट्रा बारवर छापा टाकला असता, त्या ठिकाणी २३ जुगारी जुगार खेळत असताना आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर महाराष्ट्र जुगार कायदा ४, ५ सह भारतीय दंड विधान संहिता १८८ आणि साथीचे रोग नियंत्रण कायदा कलम ३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या छाप्यात जुगाऱ्यांकडून मोबाईल, वाहने असा २३ लाख ९ हजार ४९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या बातमीमुळे शहरात खळबळ उडाली असून पोलीस यंत्रणा आणखी ठिकाणी छापे मारून अधिक तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणात १] सुनील सुरगेहळ्ळी २] नागेश सुरगेहळ्ळी ३] मंजुनाथ जाधव ४] यल्लप्पा जाधव ५] नागेश गायकवाड ६] सचिन जाधव ७] दीपक चव्हाण ८] विनायक काळे ९] राकेश हुच्चे १०] राजू जाधव ११] दीपक चव्हाण १२] जावेद शेख १३]तुळजाराम जाधव १४] अंबादास शिवशरण १५] नागेश जाधव १६] प्रशांत गायकवाड १७] रेवन जाधव १८] विनायक जाधव १९] देविदास कोकरे २०]सागर पवार २१] गजानन देशपांडे २२]अजिंक्य देशमुख आणि २३] अन्य एक अशा शहरातील सराईत २३ जुगाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here