पुणेः ‘सगळे झोपेत असताना सरकार जाईल,’ असं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी केल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा व उपमुख्यमंत्री यांच्यावर निशाणा साधला आहे. चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला अजित पवारांनी खास शैलीत उत्तर दिलं होतं. अजित पवारांच्या या उत्तरानंतर चंद्रकांत पाटलांनीही पवारांवर पलटवार केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला केंद्रात दुसऱ्यांदा सत्तेत येऊन सात वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तानं राज्याभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. अशाच एका कार्यक्रमांला चंद्रकांत पाटील उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘अजित पवारांनी भाजपवर टीका करताना तोंड सांभाळून बोलावं, नाहीतर आम्ही फाटक्या तोंडाचे आहोत. आम्ही बोलायला लागलो तर तुम्हाला महागात पडेल,’ असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना दिला आहे.

‘अजित पवारांना चांगलेच ठाऊक आहे. तुम्ही शरद पवार झोपेत असताना सरकार स्थापन करुन मोकळे झाला होतात. मात्र, अजित पवार यांना आपण काल काय केलं होतं, ही गोष्ट लक्षात राहत नाही. त्यांना कोणीही तलवारीचा धोका दाखवून शपथविधीसाठी नेलं नव्हतं. त्यामुळं आपण आज ज्या भाजपसोबत तीन दिवसांचे सरकार स्थापन केलं होतं आणि ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसलो होतो. त्यांच्याविषयी काय बोलतोय, याचे भान त्यांनी बाळगायला हवे,’ असा संताप चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

‘राष्ट्रवादीचे २८ आमदार अजित पवारांना सोबत ठेवता आले नाहीत. ते शरद पवारांकडे पुन्हा पळून गेले. हा अजित पवार यांचा दोष आहे. अजित पवार यांना सगळीकडेच राहायचे असते. जिथे सरकार तिथे मी असलेच पाहिजे, अशी अजित पवारांची प्रवृत्ती आहे, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here