मुंबईः ‘सरकार एकट्यानेच हा लढा लढू शकत नाही. हिवरेबाजार सारखे शिस्तबद्धरीतीने रोगाचा मुकाबला केल्यास आपल्यालाही कोविडशून्य गाव करता येऊ शकेलं आणि म्हणूनच हा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन राज्यातील गावांनी नियोजन करावे. राज्य शासन या प्रयत्नांना पूर्ण सहकार्य करेल,’ असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं आहे. ()

यांनी आज राज्यातील जनतेसोबत फेसबुक लाइव्हवरुन संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी करोनाची तिसरी लाट, लॉकडाऊन याबाबत भाष्य करतानाच करोनामुक्त गाव या योजनेबाबतही माहिती दिली आहे. शहरातील करोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत असताना ग्रामीण भागात मात्र करोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधलं आहे. तसंच, करोनामुक्त गाव या योजनेचाही उल्लेख त्यांनी केला आहे. यावेळी त्यांनी तरुण सरपंचांचे कौतुक केलं आहे.

‘हिवरे बाजार सारखा प्रयत्न राज्यातील काही सरपंच व गावे करीत आहेत. मी त्यांचेही कौतुक करतो. पोपटराव पवार, , कोमल ताई यांच्यासारखे सरपंच एक उदाहरण घालून देत आहेत. मी त्यांच्याशी बोलतो आहे. आज कोविडला रोखण्यात जसे वैद्यकीय उपचारांचे महत्व आहे तसेच लोकांची जागृती आणि सहभागही फार महत्वाचा आहे,’ असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, लॉकडाऊनच्या निर्बंधांमध्ये आणखी १५ दिवसांनी वाढ करण्यात आले आहेत. १५ जूनपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मात्र, लॉकडाऊन वाढवताना काही जिल्ह्यांत निर्बंध शिथिल होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. प्रत्येक जिल्ह्यांचा स्वतंत्र आढावा घेऊन त्या त्या जिल्ह्यात निर्बंध कमी केले जातील किंवा वाढवले जातील, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here