कागलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री श्री मुश्रीफ बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चंद्रकांत पाटील यांनी तंबी दिल्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता चंद्रकांत पाटील यांना मस्ती आल्याचा पुनरुच्चार करीत मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, चंद्रकांत पाटील किती फाटके आहेत आणि त्यांच्याकडे किती माया आहे, हे मला चांगलंच माहीत आहे. यापूर्वी पश्चिम बंगालच्या निकालावर बोलल्याबद्दल त्यांनी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना तुम्ही जामिनावर सुटलेले आहात, तुम्ही निर्दोष झाला नाहीत, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर अशोकराव चव्हाण यांनाही त्यांनी औकात सांगितली होती. आणि आता तर त्यांनी अजितदादांना उद्देशून आम्ही फाटक्या तोंडाचे आहोत, तोंड सांभाळून बोला, असे वक्तव्य केले आहे. यातून त्यांना मस्ती आल्याचेच दिसते, असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.
चंद्रकांत पाटील विनाकारण बेजबाबदार वक्तव्य करून स्वतःचे हसे करून घेत आहेत. त्यांनी सांभाळून बोललं पाहिजे. परवा एका वृत्तपत्रात कार्टून छापून आलं होतं. त्यामध्ये चंद्रकांत पाटील रात्री झोपेतच पलंगावरून खाली पडले आहेत आणि सरकार पडलं… सरकार पडलं…असं म्हणू लागले, अशा आशयाचं व्यंगचित्र रेखाटलं होतं. ते योग्यच आहे. खासदार विनायक राऊत यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचं मानसिक संतुलन ढासळलेल आहे. त्यांनी तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची गरज आहे, असंही मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times