नवी दिल्ली : सुशील कुमारवर सध्याच्या घडीला युवा कुस्तीपटू सागरच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पण आता सुशील कुमारवर मारहाणीचा अजून एक आरोप करण्यात आला आहे. आता तर या गोष्टीचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालेला आहे. सुशील कुमारने एका दुकानदाराला मारहाण केल्याचे प्रकरण आता समोर आले आहे. या दुकानदाराने आता आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडी आहे. आपल्या सुशील कुमारने मारहाण केल्याचे या दुकानदाराने यावेळी सांगितले आहे. त्यामुळे आता याप्रकरणी सुशील कुमारवर अजून एक गुन्हा कधी दाखल होतो, हे पाहावे लागणार आहे.

याबाबतची माहिती मुंबई मिररने दिलेली आहे. अलोक सिंग या दुकानदाराने आता सुशील कुमारवर मारहाणीचा आरोप केला आहे. अलोक सिंग यांनी यावेळी सांगितले की, ” माझ्या चार लाख रुपयांची थकबाकी शिल्लक होती. त्यामुळे हे पैसे मागण्यासाठी मी सुशील कुमारकडे गेलो होतो. त्यावेळी सुशील कुमारने मला पैसे देण्यास नकार दिला. पण मी त्यानंतरही त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्यावेळी सुशील कुमारने मला मारहाण केली. त्यानंतर सुशील कुमारबरोबर असलेल्या काही कुस्तीपटूंनीदेखील मला मारहाण केली. ही मारहाण झाल्यावर काही दिवस माझी प्रकृती अत्यावस्थ होती. या दिवसांमध्ये माझी प्रकृती गंभीर होती.”

सुशील कुमारबाबत हे पुरावे अजूनही सापडलेले नाहीत…
सुशील कुमार जेव्हा फरार होता, तेव्हा तो एका मोबाईचा वापर करत होता. या मोबाईलमुळेच तो आपल्या जवळच्या व्यक्तींना संपर्क करत होता. पण हा मोबाईलही अजून पोलिसांना सापडलेला नाही. या मोबाईमध्ये डोंगल वापरून सुशील कुमार इंटरनेट कॉल्सच्या माध्यमातून आपल्या लोकांच्या संपर्कात होता. सागरला जेव्हा मारहाण झाली तेव्हा सुशील कुमार तिथे होते. पण यादिवशी सुशील कुमारने जे कपडे परीधान केलेले होते, तेदेखील अजून दिल्ली पोलिसांना मिळालेले नाहीत. त्यामुळे या गोष्टीचा तपासही पोलिस करत आहेत. सुशील कुमार तब्बल १८ दिवस फरार होता. या १८ दिवसांमध्ये तो कोणत्या लोकांना भेटला, त्याचबरोबर कोणत्या लोकांनी त्याला मदत केली, या गोष्टीही अजून पोलिसांना समजू शकलेल्या नाहीत. सुशील कुमार फरार असताना त्याने सात गाड्यांचा वापर केला होता. पण या सर्व गाड्यांच्या मालकांना अजूनही पोलिस शोधून काढू शकलेले नाहीत. कारण या सात गाड्यांपैकी तीन मालकांचा पत्ता अजूनही पोलिसांना लागलेला नाही.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here