अमरावतीः ‘मराठा समाजाला आरक्षण मिळत असताना हे आरक्षण ओबीसीच्या कोट्यातून नको ही भूमिका संभाजीराजेंनी घेतली ती स्वागतार्ह आहे. पण काही लोकं विचित्रपणा करताता. आमच्या ओबीसी नेत्यांवर काही लोकांनी आगपाखड सुरु केली असून कोल्हापूरच्या पाटलांनी आम्हाला धमकी दिली आहे,’ असा गंभीर आरोप मदत व पुनर्वसन मंत्री यांनी केला आहे. यावेळी त्यांनी भाजपचे नेते यांचं नाव न घेता निशाणा साधला आहे. ()

मराठा आरक्षणावरुन सध्या राज्यात राजकारण रंगलं आहे. आरक्षणावरुन संभाजीराजेंनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तर महाविकास आघाडी व भाजप यांच्यात आरोप- प्रत्यारोप सुरु आहेत. मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या या विधानानं राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

‘राज्यातील ओबीसी नेत्यांना फेसबुक व पर्सनल व्हिडिओ पोस्ट करत जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत. मी, मंत्री छगन भुजबळ, बबनराव तायवडे यासारख्या आणखी ओबीसी नेत्यांना अशा धमक्या आल्या आहेत. पण धमक्या दिल्यानं प्रश्न सुटणार नाही. आरक्षणाचा प्रश्न धमकीनं नाही तर चर्चेना सुटेल, त्यामुळं धमकी न देता चर्चा करुन प्रश्न सोडवावा,’ असं आवाहन वडेट्टीवार यांनी केलं आहे. तसंच, धमकी देणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करणार असून न्यायालयीन कारवाई करणार असल्याची माहितीही वडेट्टीवार यांनी दिली आहे.

दरम्यान, ‘संभाजीराजे व आंबेडकर मराठा समाजाच्या न्यायहक्क्यासाठी एकत्र येत असतील. तर त्याचे आम्ही स्वागत करुच. पण जर राजकीयदृष्ट्या कोणाला फायदा होत असेल तर दोन्ही नेत्यांनी सावध भूमिका घ्यावी, असं ओबीसी समाजाचा कार्यकर्ता म्हणून माझं मत आहे,’ असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here