बुलडाणा: बिनधास्त आणि बेधडक वक्तव्यांमुळंओळखले जाणारे बुलडाण्याचे शिवसेनेचे आमदार (Buldana ) हे आता वेगळ्याच कारणानं चर्चेत आले आहेत. गायकवाड यांनी चक्क स्वतःच्या अंगातील शर्ट काढून रस्त्यावर पडलेलं झाड बाजूला केलं आहे. गायकवाड यांच्या या ” स्टाइल कामगिरीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

वाचा:

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. काल सायंकाळपासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळं घरावरील पत्रे उडाले तर अनेक दुकानांचे नुकसान झाले. हवेचा वेग जास्त असल्याने अनेक झाडे कोलमडून रस्त्यावर पडली आहेत. शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर संजय गायकवाड हे मतदारसंघातील परिस्थितीची पाहणी करत होते. त्यावेळी त्यांना रायरा डाबा या गावानजीक रस्त्यावर झाड पडलेलं दिसलं. त्यामुळं गायकवाड यांनी इतर कर्मचाऱ्यांना किंवा अधिकाऱ्यांना संपर्क करून वेळ न गमावता स्वतः आपलं शर्ट काढून सहकाऱ्यांच्या मदतीनं हे झाड बाजूला केलं.

वाचा:

काही महिन्यांपूर्वी घाटामध्ये भला मोठा दगड रस्त्यावर पडल्यानं अनेक वाहनांना अडथळा निर्माण होत होता. तो दगडही गायकवाड यांनी स्वतः बाजूला केला होता. आज त्यांनी हे झाड बाजूला केलं. गायकवाड यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ते सध्या ‘बाहुबली’ म्हणून चर्चेत आले आहेत.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here