मुंबई : मुंबईकरांचा प्रवास सुकर करणाऱ्या मेट्रो २ अ आणि मेट्रो ७च्या चाचणीला आजपासून सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यांच्या हस्ते याचं उद्धाटन करण्यात आलं. पण महाविकास आघाडी सरकारच्या या कार्यक्रमाला परिवहन मंत्री अनिल परब हे गैरहजर होते. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निमंत्रण पत्रिकेत नाव असूनही अनिल परब गैरहजर राहिल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. अनिल परब यांच्यावर झालेल्या आरोपानंतर त्यांची चौकशीदेखील सुरू आहे. त्यामुळे ते सरकारवर नाराज आहेत का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

खरंतर, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बनंतर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी खळबळजनक खुलासा केला होता. सचिन वाझेंनी एनआयएला लिहलेल्या पत्रात अनिल देशमुख यांच्यासह शिवसेना नेते अनिल परब यांच्यावरही गंभीर आरोप केले होते. या प्रकरणात सध्या त्यांची चौकशी सुरू असून त्यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार असल्याचंही बोललं जात आहे.

दरम्यान, मेट्रो प्रवासाचा दुसरा टप्पा अखेर सुरु होण्याच्या मार्गावर आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) आजपासून डहाणूकरवाडी ते आरे मेट्रो स्टेशनदरम्यान चाचणी सुरू झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थित हा सोहळा पार पडला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मेट्रो चाचणीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यावेळी आकुर्ली स्थानकात खास आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर, छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (सीएसएमआयए) च्या टर्मिनल १ (टी १) आणि टर्मिनल २ (टी २) ला पोहोचण्यासाठी एमएमआरडीएकडून भुयारी आणि उन्नत मार्ग प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. २४ महिन्यात हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here