हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या ३-४ तासांमध्ये पुण्यासह सातारा, रत्नागिरी, ठाणे, मुंबई, बीड, परभणी हिंगोली आणि अहमदनगर या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. आताही मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे अशा अनेक जिल्यांमध्ये ढगाळ वातावरण असून अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे.
दरम्यान, राज्यात महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाला (Rain) सुरुवात होणार असल्याची माहिती वर्तवण्यात येत आहे. यामुळे गरमी कमी होऊन नागरिकांना गारवा अनुभवता येणार आहे.
पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुणे, मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढचे ४ दिवस मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.
खरंतर, मार्चपासून आत्तापर्यंत उन्हाळ्याच्या काळात राज्यभरातच सरासरीहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. लातूर, अहमदनगर, अकोला, नंदुरबार, हिंगोली हे जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त आणि तीव्र अतिरिक्त पाऊस नोंदला गेला आहे. सांगली, जालना, परभणी, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत तीव्र अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये या आठवड्यातील पाऊस भर घालेल.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times