‘ग्रामविकास मंत्री यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष यांच्यावर टीका करताना राजकीय संकेत पायदळी तुडवत अत्यंत हीन दर्जाची भाषा वापरली. खालच्या दर्जाला जाऊन आणि सातत्याने दादांच्या बद्दल उठसूट तोंड सुख घेणे हे त्यांच्या कोणत्या संस्कृतीत बसते? एका बाजूला सत्ता येण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहित सर्वच शिवसेना नेते अत्यंत धर्माध आणि जातीवादी या महाशयांना वाटत होते. मात्र सत्तेचा बिछाना उबवत असताना ते सातत्याने सर्वच मंत्र्यांची तळी उचलून धरताना चमचेगिरी वजा वकिली स्वीकारली आहे का ?’, असा सवाल कोल्हापुरातील काही भाजप कार्यकर्त्यांनी एका पत्रकाद्वारे केला आहे. ( angry with Rural Development Minister )
चंद्रकांत पाटील यांना मस्ती आली आहे असा आरोप ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी रविवारी केला होता. याला प्रत्युत्तर देताना ऊठसूट चंद्रकांत पाटील यांच्या वर बोलणे , आता चालून घेणार नाही असा इशारा या पत्रकात देण्यात आला आहे.
भाजप कार्यकर्त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, हिमाचल, पंजाब सरकार बद्दल शेतकरी आंदोलन अथवा बिगर भाजपा राज्यातील सरकार बद्दल बोलल्यावर लगेचच मुश्रीफ महाशयांना राग येतो. खरे पाहिले, तर ज्या ठिकाणी पालकमंत्री म्हणून काम पाहतात त्या जिल्ह्याची उठाठेव करण्याऐवजी उठसूट कागल मध्ये बसून चंद्रकांत दादाच्या नावाने खडे फोडणे बंद करावे. जिथे पालकमंत्री आहेत त्या जिल्ह्यातील जनता “आपण यांना पाहिलेत का?” म्हणून टाचा घासत आहेत, टाहो फोडत आहेत ते पाहण्याऐवजी जग मान्य नेतृत्व असणाऱ्या व हे विश्वची माझे घर असे संकेत पाळणाऱ्या व देशापुढील सर्वच संकटांचा मुकाबला समर्थपणे करणाऱ्या आदरणीय पंतप्रधानांवर ही कार्यक्षमतेचा आरोप करणाऱ्या या मुश्रीफांना लाज वाटली पाहिजे !
क्लिक करा आणि वाचा-
करोनाच्या महामारी च्या काळामध्ये संपूर्ण देशामध्ये रुग्ण वाढी आणि मृत्यू बाबत हा महाराष्ट्र तसेच कोल्हापूर जिल्हा अव्वल ठरला असताना अव्यवस्थित लॉकडाउन लागू करून आपल्या सोयीनुसार जिल्ह्यामध्ये लोकांच्यावर गोकुळची निवडणूक लावून करोनचा प्रसार वाढविण्यासाठी यांनीच हातभार लावला आणि चालू लॉकडाऊनच्य काळामध्ये गोरगरिबांच्या तोंडचा घास हिरावला. रोजगार व्यवसाय बुडाले असताना त्याकडे एक जबाबदार मंत्री म्हणून लक्ष देण्याऐवजी शाब्दिक नंगानाच करत आहेत. या त्यांच्या कोल्हेकुई मुळे लोकांचे मनोरंजन होत आहे. ते त्यांनी त्वरित थांबवावे. जिल्ह्याचा एक मंत्री म्हणून या महामारी च्या काळामध्ये जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे.
क्लिक करा आणि वाचा-
पत्रकात पुढे म्हटले आहे की ,मुश्रीफ साहेब प्रत्येक गोष्टीत तुम्ही बोललेच पाहिजे असे नाही ! तुमच्यासारख्या जय चंदानी पाटलांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करू नये. यापुढे अशा पद्धतीने विद्यमान मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या दाढ्या कुरवाळत त्यांची वकिली करत चंद्रकांतदादांच्या वरची टीका टिपणी भारतीय जनता पार्टी सहन करणार नाही.
क्लिक करा आणि वाचा-
हे प्रसिद्धी पत्रक भारतीय जनता पार्टी कोल्हापूर महानगर जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस विजय जाधव, दिलीप मेत्राणी, गणेश देसाई, हेमंत आराध्ये यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times