म. टा. प्रतिनिधी, पुणे

पानशेत जवळील सोनापूर गावात रविवारी मध्यरात्री गव्याने गावकऱ्यांना दर्शन दिले. या भागात गव्यांचा वावर नसल्याने सुरुवातीला लोकांना मोठा रेडा वाटला, उजेडात आल्यावर तो असल्याची लक्षात आले. वन विभागाच्या अधिकाऱयांनी घटनेची माहिती घेतली, पण त्यांना गवा दिसला नाही. (An was spotted at midnight in Panshet area of Pune district)

पानशेत रस्त्यावर डोंगराळ भागाच्या बाजूला उंचावर सोनापूर गाव आहे. रविवारी रात्री गावातील काही तरुण रात्री बाराच्या मारुती मंदिराजवळ बसले होते. अचानक त्यांना कुत्र्यांचा नेहमीपेक्षा वेगळा भुंकण्याचा आवाज आला. काही वेळातच रिकाम्या जागेत रेडासदृश प्राणी समोर आला. त्याच्या पायावर पांढऱ्या रंगाचे मोजे घातल्याप्रमाणे पट्टे दिसले. त्यामुळे हा गवा असल्याचे लक्षात आले. तरुणांनी मोबाईलमध्ये गव्याचे रेकॉर्डिंग केले. कुत्री पाठलाग करत असल्याने गवा उताराच्या दिशेने पानशेत धरणाच्या बाजूला निघून गेला. या भागात गव्यांचा वावर नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. सागर कोकाटे, तेजस पवळे, मारुती पवळे, महादेव पवळे, आकाश पवळे यांनी व्हिडिओ काढला.

क्लिक करा आणि वाचा-
नागरिकांनी काढलेला व्हिडिओ आम्हाला दिला आहे. त्यावरून तो गवा असल्याचे स्पष्ट दिसते आहे. आमचे कर्मचारी संबंधित ठिकाणी चौकशी करून आले आहेत. सोमवारी दिवसभरात तरी गवा दिसेलला नाही. गेल्या वर्षीही या भागात गवा दिसल्याची माहिती मिळाली होती, असे वन परिक्षेत्र अधिकारी दीपक पवार यांनी सांगितले.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here