जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने घेतलेल्या नोंदिनुसार नव्याने वाढलेल्या ३१ रुग्णांमुळे आतापर्यंत विभागात बुरशीने संक्रमित झालेल्या रुग्णांची संख्या तेराशेच्या उंबरठ्यावर १२९४ पर्यंत पोचली आहे. या घडामोडीत सोमवारी दगावलेल्या १२ जणांमुळे विभागात आतापर्यंत या आजाराने १०२ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. ब्लॅक फंगसमुळे विभागात मरण पावलेल्यांपैकी ९७ मृत्यू हे एकट्या नागपुरातील आहेत.
कोव्हिड पश्चात नव्याने ब्लॅक फंगसचे निदान करण्यात आलेल्यांमध्ये पुन्हा एकदा जिल्ह्यातील रुग्ण संख्या मोठी आहे. जिल्ह्यात सोमवारी अशा २६ नव्या रुग्णांना म्युकर मायकोसिस या काळ्या बुरशीने गाठल्याचे निदान झाले. वर्धा जिल्ह्यात ३ आणि भंडारा जिल्ह्यातील २ नव्या रुग्णांचीही भर पडली.
क्लिक करा आणि वाचा-
कोरोनाच्या उपचारादम्यान स्टिरॉइडचा अतिरिक्त वापर झाल्याने कोव्हिडमधून बरे झालेल्या रुग्णांना या व्याधीचा सामना करावा लागतो आहे. सध्याच्या स्थितीत विभागातील ६५६ म्युकरग्रस्तांवर उपचार केले जात आहेत. त्यातही नागपुरात ४८७, वर्धेत ८१, चंद्रपुरात ४८, गोंदियात ३४ तर भंडारात ६ जण काळ्या बुरशीवर उपचार घेत आहेत. आता पर्यंत विभागात ८७७ बाधितांवर विविध प्रकारच्या शल्यक्रिया झाल्या आहेत. तर उपचारानंतर ५४७ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times