गोळीबारात जखमी झालेल्या तावरे यांना बारामती शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, रविराज तावरे हे पत्नी जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांच्यासोबत माळेगावातील संभाजीनगर भागातून स्वत:च्या मोटारीतून गेले होते. तेथे वडापाव घेत त्यांनी वडापाव विक्रेत्याला पैसे दिले. गाडीकडे येत असताना दुचाकीहून आलेल्या दोघानी त्यांच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी रविराज यांच्या छातीत घुसली. जखमी अवस्थेत त्यांना लागलीच येथील बारामती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
रविराज तावरे यांच्यावर शस्त्रक्रिया सुरु असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. गोळीबारामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, या घटनेनंतर माळेगाव बुद्रूक येथे तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं. या पार्श्वभूमीवर बारामती तालुका पोलिसांकडून गावात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times