नवी दिल्लीः भारताने करोनावरील लसींच्या निर्यातीवर बंदी ( ) घातल्याने जगातील ९१ देशांना आता करोनाच्या नव्या स्ट्रेनचा धोका निर्माण झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या () मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन ( ) यांनी हा अंदाज व्यक्त केला आहे. यातील बहुतेक गरीब देश ( ) हे भारतात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून उत्पादन होत असलेल्या अॅस्ट्रजेनकाच्या कोविशिल्ड लसीकवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत. यासोबतच करोनावरील नोवावॅक्स (Novavax) या लसीचीही हे देश अतुरतेने वाट पाहत आहेत.

करोनावरील लसीचा पुरवठा भारताकडून होत नसल्याने आफ्रिका खंडातील देशांना भारतात सर्वात आधी आढळून आलेल्या B.1.617.2 या करोनाच्या स्ट्रेनचा धोका आणखी वाढला आहे. इतर देशांकडूनही गरीब देशांना लसींचा पुरवठा होण्याची शक्यता नसल्यात जमा आहे. यामुळे या देशांमध्ये करोनाच्या B.1.617.2 या स्ट्रेनचा प्रादुर्भाव आणखी वेगाने होऊ शकतो. फक्त B.1.617.2 हाच व्हेरियंट नाही तर तर इतर व्हेरियंटचा प्रादुर्भावही जगभर वेगाने होऊ शकतो. हे व्हायरसचे अतिशय संसर्गजन्य व्हेरियंट आहेत. व्हायरसच्या ११७ व्हेरियंटमध्ये असंच आढळून आलं आहे, असं सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितलं. त्यांनी एनडीटीव्हीला मुलाखत दिली. त्यात त्या बोलत होत्या.

अॅस्ट्राजेनकासोबत सीरम इन्स्टिट्यूटने करार केला आहे. यानुसार सीरम इन्स्टिट्यूट कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना लसीचे जवळपास १ अब्ज डोसचा पुरवठा करणार होते. यात २०२० च्या अखेरपर्यंत ४० कोटी डोसचा पुरवठा करण्याचाही समावेश होता. आंतरराष्ट्रायी अलायन्स गावीनुसार (International Vaccine Alliance Gavi) गरीब देशांना लसीचा पुरवठा करण्यात येणार होता.

लसींचे अशाच प्रकारे असमान वितरण सुरू राहिले तर काही देशांतील स्थिती लवकरच सामान्य होईल. पण करोनाच्या आगामी लाटांमुळे गरीब देशांमध्ये मोठे संकट निर्माण करतील. पण भारताला सीरम आणि भारत बायोटेककडून मोठ्या प्रमाणावर लस खरेदी करण्यापासून कुणीही रोखू शकत नाही, असं स्वामीनाथन यांनी सांगितलं.

देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतात बिकट स्थिती निर्माण झाली. यामुळे भारताने करोनावरील लसींची निर्यात तातडीने थांबवली. लसींचा पुरवठा राज्यांकडे वळवला. सर्वांसाठी लसीकरण खुले केले. पण अजूनही अनेक राज्यांना लसीकरणासाठी लसींचा अपेक्षित पुरवठ होत नाहीए. यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला आहे. पण भारताच्या या निर्णयामुळे गावीनुसार गरीब देशांना होणारा लसींचा पुरवठा थांबला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here