नवी मुंबई: हिंमत असेल तर, आमचं सरकार पाडून दाखवा, असं खुलं आव्हान देणाऱ्या मुख्यमंत्री यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि नेते यांनी प्रतिआव्हान दिलं आहे. सरकार पाडण्याची आम्हाला गरज नाही. ते तसेही पडेल. पण हिंमत असेल तर पुन्हा जनादेशाला सामोरे जावून दाखवा. निवडणुका घ्या, असं फडणवीस म्हणाले. ते नवी मुंबईत भाजपच्या राज्यस्तरीय महाअधिवेशनात बोलत होते.

विभिन्न विचारसरणी असलेले तीन पक्ष एकत्र येऊन स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार फार काळ टिकणार नाही, अशी टीका भाजपकडून करण्यात येत असतानाच, उद्धव ठाकरे यांनी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरात जोरदार प्रत्युत्तर दिले होते. ‘आमचं सरकार मजबूत आहे. आम्ही एकत्र आहोत. तुमच्यात हिंमत असेल तर आमचं सरकार पाडून दाखवा’, अशा शब्दांत त्यांनी भाजपला खुले आव्हान दिले होते. त्यावर फडणवीस यांनी आणि मुख्यमंत्री ठाकरे यांना प्रतिआव्हान दिलं. तुम्ही तिघे एकत्र आहात ना? जनता आजही कुणाच्या बाजूने आहे हे तुम्हाला कळेल, असं ते म्हणाले.

काय म्हणाले फडणवीस?

>> भाजपचे नवनिर्वाचित अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे अभिनंदन. विधानसभेचा सामना जिंकणाऱ्या संघाचे ते कर्णधार कालही होते आणि आजही तुम्ही विजयी संघाचे कर्णधार आहात.

>> सामान्य कार्यकर्ता अध्यक्ष होतो, हे केवळ भाजपमध्येच होऊ शकते. ‘वारसा’मध्ये आपल्याकडे कुणाला काही मिळत नाही. पक्ष हे आपले परिवर्तनाचे माध्यम आहे आणि सच्चा कार्यकर्ता ही आपली ताकद आहे.

>> काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द केल्यानंतर भारताचा तिरंगा डौलाने फडकताना पाहणारे आपण भाग्यशाली कार्यकर्ते आहोत. प्रभू श्रीरामचंद्रांचे भव्य मंदिर निर्माण होताना पाहणारे आपण भाग्यशाली ठरणार आहोत.

>> प्रभू श्रीरामचंद्रांचे अयोध्येला जाऊन दर्शन जरूर घ्या, तेथे कदाचित दर्शनमात्राने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे तुम्हाला स्मरण होईल.

>> नागरिकता देणारा कायदा असताना जो गदारोळ उठविला जात आहे, तो साधा नाही. एक मोठे षडयंत्र त्यामागे आहे. सतेच्या तडफडीतून काही पक्ष देशात तणाव वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मोठे मोठे नेते बुद्धिभेद करीत आहेत.

>> आम्ही सर्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेले संविधान मानतो. दुसरे संविधान कुणीही तयार करू शकत नाही. ऐकून घेण्याचे दिवस संपले, आता सुनवण्याचे दिवस आहेत.

>> विश्वासघात तर झाला. पण आता रडण्याचे नाही तर लढण्याचे दिवस आहेत. आपण सारे शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. २२ किल्ले दिले, तर ४४ किल्ले परत घेण्याची आपली ताकद आहे.

>> विरोधासाठी विरोध करणार नाही. पण जनतेच्या विरोधातील एकही निर्णय खपवून घेणार नाही. सरकारमध्ये बसलेले चिंतामुक्त झाले, पण आता शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

>> आज महिलांवर अन्याय होत असताना सरकार गप्प आहे. २२ तारखेला प्रत्येक तहसील कार्यालयात सरकारला जाब विचारला जाईल.

>> सरकार पाडण्याची आम्हाला गरज नाही, ते तसेच पडेल. पण हिंमत असेल तर पुन्हा जनादेशाला सामोरे जावून दाखवा. तुम्ही तिघे एकत्र आहात ना? तुम्हाला कळून जाईल जनता आजही कुणाच्या बाजूने आहे.

>> आज छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान, त्यांच्या वंशजांचा अपमान, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान होत आहे. पण शिवसेना गप्प आहे. ‘शिदोरी’ मासिकावर बंदी घालून दाखवा.

>> आपल्याला धर्मासाठी लढायचे आहे. जे अधर्माच्या सोबत आहेत, ते जुने मित्र असले तरी त्यांच्याविरोधात सुद्धा लढावे लागेल.

>> आपल्या विजयाची सुरूवात नवी मुंबईपासून होईल. औरंगाबाद महापालिकेवर सुद्धा भाजपचाच झेंडा फडकेल. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात हे विजयी अभियान असेच सुरू राहील.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here