मुंबईः विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. फडणवीस- पवार भेट म्हणजे ऑपरेशन लोटसचे संकेत तर नाही ना?, अशी शंका उपस्थित करण्यात येत होती. यावर शिवसेनेचे नेते यांनी भाष्य केलं आहे.

फडणवीस यांनी शरद पवार यांची सिल्व्हर ओक या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. खुद्द फडणवीस यांनीच सोमवारी ट्वीट करून या भेटीची माहिती दिली होती. मात्र, या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आलं होतं. यापार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस- शरद पवार यांच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका. या भेटीमुळं ऑपरेशन लोटस वगैरे घडणार नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

‘महाराष्ट्रातील नेते एकमेकांना भेटत असतात. आपल्याकडे तशी पंरपरा आहे. शरद पवारांची प्रकृती थोडी खराब आहे. त्यामुळं फडणवीसांनी सदिच्छा भेट दिली असेल, असं राऊतांनी म्हटलं आहे.

वाचाः

‘शरद पवार यांनी विरोधी पक्षनेता म्हणून काम केलं आहे. त्यामुळं पवारांकडून फडणवीसांना चांगलं मार्गदर्शनच मिळाले असेल, असं राऊतांनी म्हटलं आहे. शरद पवारांनी फडणवीसांना सत्तेचा मंत्र दिला असेल. विरोधी पक्ष ज्याप्रकारे सरकारच्या कामात अडथळे निर्माण करत राहिला तर पुढची १०० वर्षे तुमची सत्ता येणार नाही, हे नक्कीच पवारांनी फडणवीसांना सांगितलं असेल, असा टोला राऊतांनी लगावला आहे.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here