मुंबई: राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून शिवसेना व भारतीय जनता पक्षामध्ये कलगीतुरा सुरू आहे. प्रत्येक मुद्द्यावरून दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमकी सुरू असतात. कोविड संकटानंतर या चकमकी वाढल्या आहेत. कोविडच्या गोंधळाला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेकडून भाजपवर केला जातो. आता मराठा आरक्षणासाठीही केंद्राकडंच बोट दाखवलं जात आहे. त्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी मुख्यमंत्री यांना जोरदार टोला हाणला आहे. ()

‘प्रत्येक गोष्ट केंद्र सरकारवर ढकलायची सवय या सरकारला झाली आहे. उद्या यांच्या लग्नासाठी मुलगी बघायची झाली तर त्यासाठी देखील महाविकास आघाडीचं सरकार केंद्राला पत्र लिहील. तुमच्या पाहण्यात कुणी असेल तर सांगा असं म्हणतील,’ असा बोचरा टोला पाटील यांनी हाणला. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

वाचा:

केंद्र सरकारनं कायदा केल्यास मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं, असं राज्य सरकारचं म्हणणं आहे. राज्याच्या या भूमिकेचाही त्यांनी समाचार घेतला. ‘जनता मूर्ख आहे असं महाविकास आघाडी सरकारला वाटतं. राज्यात गेल्या दीड वर्षापासून मागास आयोगच अस्तित्वात नाही. केंद्र सरकारचा त्याच्याशी काहीएक संबंध नाही,’ असं पाटील म्हणाले.

संभाजीराजेंच्या राजीनाम्यानं काय होणार?

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदारकीचा राजीनामा देण्याचीही तयारी आहे, असं विधान भाजपचे राज्यसभेतील खासदार संभाजीराजे भोसले यांनी केलं होतं. त्यावरही पाटील यांनी भाष्य केलं. ‘संभाजीराजेंनी राजीनामा दिल्यामुळं नेमकं काय साध्य होणार आहे हे मला कळत नाही. त्यांच्या राजीनाम्यानं कुणावर परिणाम होणार आहे. हे कोडगं सरकार आहे,’ असं ते म्हणाले. संभाजीराजे यांच्यावर पाळत ठेवली जात असल्याचीही सध्या चर्चा आहे. त्याचा पाटील यांनी निषेध केला.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here