मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस () यांनी देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार () यांची मुंबईत भेट घेतल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. याच भेटीवर आता चंद्रकांत पाटील () यांनीसुद्धा आपलं मत व्यक्त केलं आहे.

खरंतर, या भेटीवर उलट-सुलट चर्चा सुरू असताना ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं. तरीसुद्धा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असल्यामुळे चंद्रकांत पाटील यांना देखील या संबंधी प्रश्न विचारण्यात आला. यावर तुम्हाला जो प्रश्न पडलाय तोच मला देखील पडला आहे. नेमकं काय चाललंय? असं सूचक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

आपण प्रत्येक गोष्टीचा राजकीय अर्थ काढतो, पण शरद पवार आणि फडणवीस यांची भेट ही फक्त सदिच्छा भेट असल्याचं यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले. शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी फडणवीसांनी पवारांची भेट घेतली. त्यांच्या सध्याच्या आरोग्याची काळजी असल्याने या परिस्थितीमध्ये शरद पवार यांच्याशी राजकीय चर्चा करण्याचं कोणाचंही धाडस होणार नाही असंही यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची काल मुंबईत भेट घेतल्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कोथळी येथील घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी माजी मंत्री गिरीश महाजन हे देखील उपस्थित होते. फडणवीसांच्या या भेटीमुळं राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. (Devendra Fadnavis Visits Eknath Khadse Home)

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर व रावेर तालुक्यात गेल्या आठवड्यात मान्सूनपूर्व वादळी पावसाने मोठे थैमान घातले. यात केळीच्या बागांसह घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. दौऱ्याची सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे खडसेंच्या घरी सदिच्छा भेट दिली. या ठिकाणी त्यांनी एकनाथ खडसेंच्या सून तथा भाजप खासदार रक्षा खडसे यांच्यासह इतर भाजप पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here