मुंबई: ‘ ही सतत काम करणारी संघटना आहे. त्यामुळं लोकांना शिवसेनेबद्दल आत्मीयता वाटते. शिवसेनेची मंडळी लोकांना आपल्या घरातलीच वाटतात. त्यामुळं शिवसेनेला निवडणुकीची आणि पराभवाची भीती वाटत नाही. तसं कुणाला वाटत असेल तर ती त्यांची पोटदुखी आहे,’ असा जोरदार पलटवार महापौर यांनी आज भाजपवर केला. (Kishori Pednekar Reply To Ashish Shelar)

वाचा:

भाजपचे आमदार अॅड. यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन महापालिका निवडणुकीच्या () अनुषंगानं शिवसेनेवर अनेक आरोप केले. पराभवाच्या भीतीनं महापालिकेची निवडणूक दोन वर्षे पुढं ढकलण्याचा शिवसेनेचा डाव होता. तो फसल्याचा आरोप शेलार यांनी केला होता. त्यांच्या या आरोपांचा महापौरांनी जोरदार समाचार घेतला. ‘ काळात मुंबईकरांना कोणी वाचवलं आणि संकटाच्या दरीत कोणी ढकललं हे मुंबईकरांना चांगलं माहीत आहे. शिवसेना आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार प्रत्येक स्तरावर जाऊन मुंबईकरांसाठी काम करतेय. मुख्यमंत्री कुटुंबप्रमुखाप्रमाणे जनतेची काळजी घेत आहेत. हीच विरोधकांची पोटदुखी आहे. त्यांच्या पोटदुखीवर आमच्याकडं औषध नाही आणि मुंबईकरही त्यांना फसणार नाहीत,’ असा टोला पेडणेकर यांनी हाणला.

वाचा:

‘करोनाच्या पहिल्या लाटेनंतर महापालिकेच्या निवडणुका घ्यायचा शिवसेनेचा प्लान होता, असा आरोही शेलार यांनी केला होता. तोही महापौरांनी फेटाळून लावला. ‘हे प्लान भाजपचे असतील. खाई त्याला खवखवे, अशी एक म्हण आहे. ती भाजपला लागू होते. काहीतरी आरोप करायचे, आभास निर्माण करायचा हाच त्यांचा प्रयत्न असतो. हा विरोधी पक्ष आहे. आरोप करणं हा त्यांचा उद्योग आहे. तो उद्योग भाजपवाले चांगला करतात. तो त्यांना करू द्या. त्यांचे आरोप खोडण्यामध्ये आम्हाला वेळ घालवायचा नाही. आम्हाला लोकांचे प्रश्न सोडवण्याकडं लक्ष द्यायचं आहे,’ असंही महापौर म्हणाल्या. ‘उत्तर प्रदेशात मृतदेह नद्यांमध्ये टाकावे लागले. तिथं भाजपची सत्ता आहे. यापेक्षा मोठं दुर्दैव काय असू शकतं. मृत्यूचं तांडव सुरू असताना निडणुका घेणाऱ्यांच्या आरोपांना उत्तर देण्याची आम्हाला गरज नाही. त्यांना उलट्या बोंबा मारू द्या,’ असंही महापौर म्हणाल्या.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here