नागपूर: कोव्हिडचा विळखा कमी झाल्याने सर्जिकल कॉम्प्लेक्स पूर्णपणे नॉन कोव्हिड रुग्णांसाठी खुले करा, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या डॉक्टरांना रुग्ण सेवेतून सवलत द्या, या हट्टाला पेटलेल्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) निवासी डॉक्टरांनी मंगळवारपासून सामूहिक रजेचे हत्यार उपसले. (Mayo Doctors on Mass Leave)

जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांनी केलेल्या मनधरणीला झुगारून रजेवर गेलेल्या या डॉक्टरांमुळे मंगळवारी मेयोतील रुग्ण सेवा मात्र अंशत: खंडित झाली. या घडामोडीत अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांनी डॉक्टरांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तोही निष्फळ ठरला. जोवर मागण्या मान्य होत नाहीत, तोवर कामावर रुजू होणार नाही, अशी टोकाची भूमिका आता निवासी डॉक्टरांनी घेतली आहे.

वाचा:

हा सगळा घटनाक्रम सुरू असताना आंतरवासिता (प्रशिक्षणार्थी) डॉक्टरांनीही निवासी डॉक्टरांच्या सामुहिक रजेला पाठींबा दिल्याने हे सामूहिक रजा प्रकरण चिघळण्याची भिती निर्माण झाली आहे. राज्यात कोव्हिडचा प्रकोप वाढल्यापासून सरकारी मेडििकल कॉलेजमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम पुर्ण करण्यासाठी आलेल्या निवासी डॉक्टरांना रुग्णसेवेत जुंपण्यात आले आहे. गेल्या पंधरा महिन्यापासून आम्ही निवासी डॉक्टर अहोरात्र रुग्ण सेवेत झटत आहोत. मात्र त्यामुळे पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या इतर विषयांकडे दुर्लक्ष होत आहे. कोव्हिड असाच वाढत गेला तर आम्ही इतर विषय शिकायचेच नाहीत, का अशी या निवासी डॉक्टरांची सामुहिक रजेमागची भूमिका असल्याचं डॉ. नितीन जगताप यांनी स्पष्ट केली.

वाचा:

या बाबत मेयो प्रशासनाची बाजू जाणून घेतली असता अधिष्ठाता डॉ. केवलिया यांनी मात्र कोणतीही भूमिका मांडण्यास नकार दिला. त्यामुळे मेयो प्रशासनाच्या भूमिकेवर संशय निर्माण झाला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here