डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा परिसर असलेल्या या भागात बिबट्यानं शिकारीवर ताव मारलाय. सकाळी प्रादेशिक कृषी विस्तार कर्माचाऱ्यांना बिबट्यानं अर्धवट सोडून दिलेली ही शिकार दिसताच त्यांची चांगलीच बोबडी वळली.
तिन दिवसांपर्वी आयटी पार्क परिसरातल्या पॉवर इन्स्टिट्यूटजवळील भर वस्तीत या बिबट्यानं सर्वांत प्रथम दर्शन दिलं होतं. त्यानंतर सोमवारी महाराज बाग परिसरात काम करणाऱ्या एका महिलेला सकाळी पुलावर हा बिबट्या दिसला होता. तेव्हा पासून या बिबट्याला पिंजऱ्यात पकडण्यासाठी वन विभाग आणि ट्रांझिट ट्रिटमेंट सेंटरची रेस्क्यू टिम परिसर पिंजून काढत आहे. मात्र वनविभागाला चांगलाच गुंगारा देत या बिबट्यानं सोमवारी रात्री डुकराची शिकार करून त्यावर ताव मारला.
क्लिक करा आणि वाचा-
आता अखेर बिबट्यानं डुकराची शिकार केल्याचे सकृत दर्शनी सिद्ध झाल्याने बिबट्या दिसल्याच्या वावड्यांवरही पूर्ण विराम मिळाला आहे. या घडामोडीत वन विभागाच्या टीमनं डॉन स्कॉडच्या माध्यमतून बिबट्याचा माग घेण्याचा प्रयत्न केला. स्निफर डॉग्ज नं ही बिबट्याचा संभाव्य मार्गाकडे इशारा केल्यानं वन विभागानंही त्या दिशेनं कोम्बिंग ऑपरेशन हाती घेतलं आहे.
क्लिक करा आणि वाचा-क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times