जळगाव: ‘ संकटामुळे राजकीय सत्तांतरासारख्या विषयाकडे लक्ष द्यायला आम्हाला वेळ नाही. हे संकट ओसरल्यानंतर राज्यातील सत्तांतराचे पाहू’, असे सूचक विधान राज्याचे विरोधी पक्षनेते यांनी येथे केले. ( )

वाचा:

देवेंद्र फडणवीस यांनी आज जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर व रावेर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. यानंतर रावेर तालुक्यातील तांदलवाडी येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. सरकारवर रोज लागणारे गंभीर आरोप, सरकारची असलेली अवस्था आणि त्यातच पंढरपूरचा आलेला निकाल पाहता डॅमेज कंट्रोलची आम्हाला नाही, सरकारला गरज असल्याचा टोला यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. माझा दौरा आज संपत नाहीय. मी शेतकऱ्यांच्या भेटीसाठी याठिकाणी आलो आहे. यापुढे मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत मी जाणार आहे. ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. त्याठिकाणी त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी जाणार आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारपर्यंत पोहचवणे हे माझे कामच आहे, असेही त्यांनी सांगितले.

वाचा:

शरद पवारांच्या भेटीनंतर सुरू झालेल्या चर्चेचे खंडन करताना फडणवीस म्हणाले की, आपण फार संकुचित विचार करायला लागलो आहोत. राजकीय किंवा वैचारिक विरोधक अशी आपण महाराष्ट्रात एक संस्कृती पाळतो. आपण एकमेकांचे शत्रू नाहीत. हे आमचे वैचारिक विरोधक आहेत, पण ते ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्या आहेत. त्यांची खुशाली विचारायला मी भेट घेतली. मला कोविड झालेला होता तेव्हा पवार साहेबांसहित अनेक नेत्यांनी माझी फोनवर विचारपूस केली होती. तशी विचारपूस करण्यासाठी मी भेट घेतली. त्यामुळे शरद पवारांच्या भेटीला राजकीय आयाम देण्याची गरज नाही, असे त्यांनी सांगितले. रक्षा खडसे या भाजपच्या खासदार आहेत. त्यांनी मला मतदारसंघात आल्याने चहाचे निमंत्रण दिले होते. म्हणून मी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली, असेही फडणवीस म्हणाले.

वाचा:

मराठा आरक्षण प्रश्नी आम्हाला राजकारण करायचे नाही. मराठा आरक्षणाच्या विषयाबाबत छत्रपती संभाजीराजे यांनी स्पष्ट भूमिका यापूर्वी मांडली आहे. पहिले तर त्यांनी सर्व पक्षांनी एकत्र यावे म्हणून सांगितले. आम्ही त्याबद्दल सकारात्मक आहोत. मी त्यांना सांगितले की, मराठा आरक्षण प्रश्नी आम्हाला राजकारण करायचे नाही. आम्हाला सरकारने बोलावले तर आम्ही त्यांच्यासोबत जाऊ. नव्हे तर त्यांना पूर्ण सहकार्य करू पण त्यांनी राजकारण केले तर आम्ही राजकीय उत्तर देऊ. या प्रश्नी संभाजीराजे यांनी पक्षाच्या विरोधी भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे अकारण वाद घालू नये, असेही फडणवीस यांनी सांगितले.

यांच्यावर टीका

संजय राऊत यांची अवस्था सध्या घर का ना घाट का अशी झाली आहे. ते सध्या संपादक देखील नाहीत. ‘सामना’च्या मुख्य संपादक आमच्या रश्मी वहिनी आहेत. त्यामुळे त्यांना तिकडे पण काम उरलेले नाही. ज्याच्याकडे कुणी लक्ष देत नाही, त्याला लक्ष वेधून घ्यावे लागते. तसा प्रकार ते करत असल्याची टीका फडणवीस यांनी केली.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here