सोलापूर: मोहोळ तालुक्यातील खवणीचे ग्रामसेवक आणि गावकामगार तलाठी यांनी कोरोना महामारीसारख्या संकटककाळात गावात सतत गैरहजर राहत ग्रामस्थांना वाऱ्यावर सोडले असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. याप्रकरणी वरिष्ठांना देखील लेखी तक्रार देऊनसुद्धा कोणतीच दखल न घेतल्याने आज संतप्त ग्रामस्थांनी थेट ग्रामपंचायतीला टाळे ठोकले. याप्रकरणी संबंधितांवर तात्काळ कायदेशीर कार्यवाही होत नाही तोपर्यंत ग्रामपंचायत कार्यालय व तलाठी कार्यालय बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी वतीने घेतला आहे. (angry office in khavni village in solapur district)

याबाबत माहिती अशी की, नव्याने सत्तेवर आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांची पहिली मासिक सभा दि. ३ मार्च रोजी घेण्यात आली होती. त्यावेळी ग्रामसेवक मिलिंद तांबीले यांनी नूतन ग्रा.पं. सदस्यांना ग्रामपंचायतीची कोणतीच माहिती उपलब्ध करून दिली नाही. ही ग्रामसभा ही तहकुब केली होती. तहकूब केलेली पहिली मासिक सभा अद्यापपर्यंत घेतलेली नाही व या तहकूब ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायतीचे दप्तर, बॅंक खाते पुस्तक आणि ग्रामपंचायतीचे दप्तर उपलब्ध करुन दिलेले नाही, तसेच नूतन ग्रामपंचायत सदस्यांना ग्रामपंचायत कामकाजाबाबत कसलीही माहिती न देता त्यांना दमदाटी केल्याची तक्रार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, मोहोळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दि. ५ मार्च २०२१ रोजी दिलेली होती. तसेच कोरोना पार्श्वभूमीवर ग्रामसेवक हे ग्रामपंचायत कार्यालयात गेल्या दोन महिन्यापासून सतत गैरहजर असल्याची तक्रारही सर्व संबंधितांना दिलेली होती. तरीही सबबप्रकरणी वरिष्ठ स्तरावरुन कोणतीही कार्यवाही झालेली नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

दुसरीकडे सध्या खवणी गावात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढत असून कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना व घ्यावयाची काळजी इत्यादीबाबत गावकऱ्यांचे प्रबोधन करणे, शासनाने व आरोग्य विभागाने कोरोना संसर्गाबाबत वेळोवेळी निर्गत केलेले नियमांची माहिती ग्रामस्थांना समजावून सांगणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तसेच गावातील सार्वजनिक स्वच्छता,पिण्याचे पाणी,दिवाबत्ती व विज पुरवठा, आरोग्याच्या बाबी इत्यादी मुलभूत समस्या व समस्यांना सामोरे जाताना ग्रामस्थानां अनंत अडचणी येत आहेत.

क्लिक करा आणि वाचा-
शिवाय मौजे खवणी ग्रामस्थांना आरोग्य उपकेंद्र पाटकूल केंद्रामार्फत कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले, त्यावेळीही ग्रामसेवक व तलाठी गैरहजर होते, असे ग्रामस्थ सांगतात. कोरोनाच्या कठीण काळात ग्रामसेवक बेफिकीरपणे सतत कामात कुचराई व गैरहजर असलेबाबत ग्रामपंचायतीने लेखी तक्रार दिलेली आहे. त्याचबरोबर तरीही गावकामगार तलाठीही गेली १ वर्ष गावामध्ये आलेले नसल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे, असे ग्रामस्थांनी म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा-
खवणी गावात सरपंच यांचे अध्यक्षतेखाली करोना संसर्ग आजाराबाबत ग्रामस्थांनी घ्यावयाची काळजी व लसीकरणाबाबत बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला गाव कामगार तलाठी,आरोग्य कर्मचारी,प्राथमिक शिक्षक,ता. पं. स. विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) हे गैरहजर असल्याची लेखी तक्रार खवणी ग्रामस्थांनी सोलापूरचे आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी सोलापूर, मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर, उपविभागीय अधिकारी उपविभाग पंढरपूर, गटविकास अधिकारी मोहोळ, तहसीलदार मोहोळ, पोलीस निरीक्षक मोहोळ यांना दिलेली आहे.

क्लिक करा आणि वाचा-

या प्रकरणी बेजबाबदार ग्रामसेवक व तलाठी यांचेवर तात्काळ योग्य ती कायदेशीर कार्यवाही करून त्यांचे ठिकाणी दुसरे ग्रामसेवक व गाव कामगार तलाठी यांची नियुक्ती करण्यात यावी. याबाबत असेही मौजे खवणी ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here