मुंबई: मुंबईतील संसर्गाचा ग्राफ वेगाने खाली येत आहे. मंगळवारी नवीन बाधितांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या खूप मोठी राहिली. दिवसभरात ८३१ नवीन रुग्णांची नोंद झाली तर ५ हजार ८६८ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले. महत्त्वाची बाब म्हणजे मुंबईत अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १७ हजार ३२८ इतकी खाली आली असून रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांवर पोहचला आहे. ( )

वाचा:

महापालिकेने करोनाच्या पहिल्या लाटेप्रमाणेच दुसऱ्या लाटेतही नियोजनबद्धपणे उपाययोजना केल्याने संसर्गावर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांपासून हजाराच्या खाली आली आहे. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी थोडीशी रुग्णवाढ झाली असली तरी आकडा हजाराच्या खालीच राहिला आहे.

वाचा:

गेल्या २४ तासांत मुंबईत करोनाच्या विळख्यात सापडलेल्या २३ रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत एकूण १४ हजार ९०७ जणांना जीव गमवावा लागला आहे. मंगळवारी मुंबईत ८३१ नवीन बाधितांची नोंद झाली तर ५ हजार ८६८ रुग्ण करोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी परतले. मुंबईत दिवसभरात एकूण २३ हजार ५०३ चाचण्या करण्यात आल्या. मुंबईतील करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्क्यांवर पोहचले असून रुग्णवाढीचा दर ०.१५ टक्के इतका कमी झाला आहे तर रुग्ण दुपटीचा कालावधी ४५३ दिवसांवर गेला आहे. मुंबईत सध्या चाळी आणि झोपडपट्टीत ३५ कंटेनमेंट झोन आहेत तर १५३ इमारती सील करण्यात आलेल्या आहेत.

वाचा:

जिल्ह्यात ५१४ नवे रुग्ण

ठाणे जिल्ह्यात मंगळवारी नवीन ५१४ करोना रुग्णांची वाढ झाली असून यापैकी ठाणे शहरामध्ये १२४, ११५, ७६, उल्हासनगर ३३, भिवंडी ६, मिरा-भाईंदर ५६, अंबरनाथ १९, बदलापूर २५ आणि ठाणे ग्रामीणमध्ये ६० नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात जिल्ह्यामध्ये ४० बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून एकूण करोनाबळींची संख्या ९ हजार २८८ वर गेली आहे. तर अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये मंगळवारी एकाही रुग्णांचा मृत्यू झाला नाही.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here