कोलकाताः केंद्र सरकार आणि पश्चिम बंगाल सरकारमधील वादामुळे ( ) यांना मुख्य सचिवपदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ( ) यांनी त्यांची तीन वर्षांसाठी मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार म्हणून नेमणूक केली. बंडोपाध्याय यांची केंद्र सरकारने आदेश काढून केंद्रात प्रतिनियुक्ती केली होती. पण बंडोपाध्याय यांनी मुख्य सचिवपदाचा राजीनामा दिला आणि त्यांनी प्रतिनियुक्तीवर जाणं टाळलं. आता यावरून केंद्र सरकारने बंडोपाध्याय यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटीसवर कायदे तज्ज्ञांनी वेगवेगळी मतं दिली आहेत. काहीचं म्हणणं आहे की याने सरकारला फार काही कारवाई करता येणार नाही. तर काहीचं म्हणणं आहे सेवा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करता येऊ शकते.

बंडोपाध्यायना २ वर्षांची कैद होऊ शकतो?

केंद्रीय गृह मंत्रालयाने आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत बंडोपाध्याय यांना नोटीस बजवाली आहे. बंडोपाध्याय यांना गृह मंत्रालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या कायद्यांतर्गत बंडोपाध्याय यांना २ वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. केंद्र सरकारने बंडोपाध्याय यांना आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील कलम ५१-ब नुसार कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसंच या नोटीशीला ३ दिवसांत उत्तर देण्याची सूचना केली आहे. ३ दिवसांत उत्तर न दिल्यास त्यांच्याविरोधात एफआयआरही दाखल होऊ शकतो, असं बोललं जातंय.

‘नोटीस कायद्याच्या कसोटीवर टीकणारी नाही’

कारणे दाखवा नोटीस ही कायद्याच्या कसोटीवर टीकणारी नाही, असं ज्येष्ठ वकील विकास रंजन भट्टाचार्य यांनी सांगितलं. एखाद्या बैठकीत अनुपस्थित राहणं म्हणजे आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत असलेल्या नियमांचे उल्लंघन होत नाही. यामुळे बंडोपाध्याय यांना जारी करण्यात आलेली कारणे दाखवा नोटीस कायद्याच्या कसोटीवर टीकणारी नाही, असं त्रिपुराचे अॅडव्होट जनरल म्हणून काम केलेल्या माकपच्या नेत्याने सांगितलं.

आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन!

आपत्ती व्यवस्थापन कायद्यांमधील कलमांनुसार काम न करणाऱ्या व्यक्तीविरोधात कारवाई केली जाऊ शकते. त्यांनी सेवा नियमांचे आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केले आहे, असं वकील लोकनाथ चॅटर्जी म्हणाले.

तर आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलम ५१-ब नुसार कारणे दाखवा नोटीस जारी करण्याची कुठलीही तरतूद नसल्याचं आणखी एक वकील जयंत नारायण चॅटर्जी यांनी सांगितलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here