वाचा:
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये रुग्णांच्या पॉझिटिव्हिटीचे प्रमाण हे दहा टक्क्यांपेक्षा अधिक असल्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी या भागातील निर्बंध कायम ठेवले आहेत. त्यानुसार बाहेरील जिल्ह्यांतील नागरिकांना जिल्ह्याच्या हद्दीत येताना ४८ तास अगोदरचा आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सोबत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
वाचा:
मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमधून चालक आणि मदतनीस अशा दोन व्यक्तींनाच प्रवास करण्यास परवानगी असणार आहे. अन्य राज्य किंवा जिल्ह्यांतून खासगी वाहनांमधून येणाऱ्या नागरिकांना आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सोबत ठेवावा लागणार आहे. जिल्ह्यातील दूध संकलन केंद्र आणि दूध वाहतूकही सुरू राहणार असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
‘हॉटस्पॉट’ गावांच्या संख्येत चाळीसने घट
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील संसर्ग कमी होऊ लागल्याने मागील आठ दिवसांत ‘हॉटस्पॉट’ गावांच्या संख्येत चाळीसने घट झाली आहे. त्यात वेल्हा तालुका हॉटस्पॉटमुक्त झाला आहे. आणि मावळ तालुक्यात हॉटस्पॉट गावांची संख्या कमी होण्याएवजी वाढली आहे. खेड तालुक्यात सर्वाधिक ४७ गावे हॉटस्पॉट असून, जुन्नर, आंबेगाव, मावळ, इंदापूर, शिरूर आणि बारामती या तालुक्यांमध्ये तीसपेक्षा अधिक हॉटस्पॉट संख्या आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times