म. टा. प्रतिनिधी ।

येथील पिराजी नगर येथे चारित्र्यावर संशयावरून एका व्यक्तीने पत्नीचा खून करत स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. सकाळी झोपून उठलेल्या दोन मुलांना आई-वडिलांचे मृतदेह पाहिल्यानंतर प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी चंदन नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. ( Man suicide after killing wife)

उषा योगेश गायकवाड (वय २८) यांचा खून करून योगेश तानाजी गायकवाड (वय ३३) याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

वाचा:

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उषा व योगेश यांचा विवाह तेरा वर्षांपूर्वी झाला होता. त्यांना १० आणि ८ वर्षाची दोन मुले आहेत. मयत उषा गायकवाड या घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायच्या. तर योगेश गायकवाड हा काहीही काम नसल्यामुळे घरीच बसून होता. तो पत्नीच्या चारित्र्यवर सतत संशय घ्यायचा. यामुळे त्यांच्यात सतत वाद होत होते. सोमवारी रात्री देखील त्यांच्यात याच कारणावरून वाद झाले. रात्री मुले झोपल्यानंतर योगेश गायकवाड यानं गळा आवळून पत्नीचा खून केला आणि त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी मुले जेव्हा झोपेतून उठली तेव्हा त्यांना वडील छताला लटकलेल्या अवस्थेत दिसले, तर आई निपचित पडली होती. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी चंदन नगर पोलिस अधिक तपास करत आहेत.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here