एकनाथ खडसे यांनी काही महिन्यांपूर्वीच भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. फडणवीस यांच्यामुळेच आपल्याला पक्ष सोडावा लागला, असा आरोप खडसे यांनी त्यावेळी केला होता. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले होते. फडणवीस यांच्यावर टीकेची एकही संधी खडसे सोडत नाहीत. अशा परिस्थितीत फडणवीस यांनी त्यांच्या घरी सदिच्छा भेट दिल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती.
वाचा:
‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलताना एकनाथ खडसे यांच्या सूनबाई रक्षा खडसे यांनी महत्त्वाची माहिती दिली. ‘फडणवीस हे पहिल्यांदाच आमच्या घरी आले होते अशातला भाग नाही. यापूर्वीही ते घरी आले आहेत. आमच्या कुटुंबीयांशी त्यांचे संबंध चांगले आहेत. राजकारण हे राजकारणाच्या जागी आहे. त्यामुळं नाथाभाऊंचही त्यांच्याशी बोलणं झालं,’ असं रक्षा खडसे म्हणाल्या.
‘मी भाजपची खासदार आहे. माझ्या पक्षाचे नेते मतदारसंघात आल्यानंतर त्यांना घरी बोलवणं, चहापाण्यासाठी विचारणं माझं कर्तव्य आहे. ते मी केलं. यावेळी कार्यकर्त्यांच्याही भेटी झाल्या,’ असं त्या म्हणाल्या. खडसेंच्या कोथली येथील घरात असलेल्या कमळाच्या चिन्हाच्या घड्याळाबद्दल विचारलं असता रक्षा खडसे म्हणाल्या, ‘नाथाभाऊ आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत हे खरं आहे. पण, ते पूर्वी भाजपमध्ये होते. तेव्हापासूनच्या या वस्तू आहेत.’
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times