अहमदाबादः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत यांनी घटस्फोटाच्या वाढत्या प्रमाणावर चिंता व्यक्त केलीय. शिक्षित आणि संपन्न कुटुंबांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण अधिक आहे, असं भागवत म्हणाले. शिक्षण आणि संपन्नतेमुळे अहंकार निर्माण होतोय. यामुळे कुटुंब विभक्त होत आहे, असं भागवत यांनी सांगितलं. अहमदाबादमधील एका कार्यक्रमात भागवत सहकुटुंब आले होते. यावेळी त्यांनी संघ कार्यकर्त्यांना संबोधित केले. भारतात हिंदू समाजाला दुसरा कुठलाही पर्याय नसल्याचं ते म्हणाले.

देशात घटस्फोटाचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहेत. निरर्थक कारणांवरून कुटुंबात भांडणं होत आहेत. शिक्षित आणि संपन्न कुटुंबांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण अधिक आहे. अहंकारामुळे कुटुंब तुटत आहेत. यामुळे समाजातही दुरावा निर्माण होतोय, असं म्हणाले. स्वयंसेवक संघाच्या कामाची माहिती आपल्या कुटुंबातील सदस्यांना देत असतील अशी अपेक्षा आहे. कारण अनेकदा महिला सदस्यांना आपल्यापेक्षा अधिक कठिण काम करावं लागतं. त्यांना माहिती दिल्यास आपलं काम अधिक सोपं होईल, असं त्यांनी संघाच्या स्वयंसेवकांना सांगितलं.

आपण महिलांना घरपर्यंतच मर्यादित ठेवलंय

गेल्या २ हजार वर्षांपासून आपण परंपरांचे पालन करत आलोय. यानुसार आपण महिलांना घरापर्यंत मर्यादित ठेवलं आहे. ही स्थिती २००० सालच्या आधी नव्हती. ते आपल्या समाजाचे सुवर्णय युग होते. मी हिंदू आहे आणि सर्व धर्मांच्या पवित्र स्थळांचा सन्मान करतो. पण आपल्या श्रद्धेवर कायम आहे. हे संस्कार कुटुंबातूनच मिळाले आहेत. आईने ते दिले आहेत, असं भागवत म्हणाले.

कुटुंबाशिवाय समाज
बनू शकत नाही

कुटुंब आणि महिलेशिवाय समाज बनू शकत नाही. देशातील लोकसंख्येत पन्नास टक्के वाटा पुरुषांचा आणि पन्नास टक्के वाटा महिलांचा आहे. यामुळे महिलांना शिक्षण दिलं पाहिजे. समाजाची चिंत केली नाही तर आपण वाचणार नाही आणि कुटुंबही राहणार नाही. भारतात हिंदू समाजाशिवाय कुठलाही पर्याय नाही आणि हिंदू समाजाला कुटुंबाप्रमाणे वर्तन करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, असं मोहन भागवत यांनी सांगितलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here